ETV Bharat / state

औरंगाबादेत एमआयएम नगरसेवकांमध्ये मारामारी, तीन जण जखमी

author img

By

Published : May 15, 2020, 2:57 PM IST

मनपा गटनेता नासेर सिध्दीकी यांच्या वार्डात महावितरण विभागाकडून मान्सून पूर्व दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. सिध्दीकी यांनी महावितरणकडे याबाबत तक्रार नोंदवली होती. या नंतर महावितरणमध्ये कंत्राटदार असलेले अज्जू नाईकवाडे यांचे भाऊ तय्यब नाईकवाडे हे दुरुस्तीच्या कामासाठी रशिदपुऱ्यात आले होते. त्यांनी नासेर सिध्दीकीला महावितरणकडे तक्रार का केली? म्हणून जाब विचारत वाद घातला.

Injured
जखमी

औरंगाबाद - एमआयएमच्या दोन गटात भररस्त्यात सिनेस्टाईल मारामारी झाली. यात एका गटातील मनपा गटनेता नासेर सिध्दीकी आणि दुसऱ्या गटातील नगरसेवक तथा माजी जिल्हाध्यक्ष अज्जू नाईकवाडे व त्यांचा पुतण्या अर्शद नाईकवाडे जखमी झाले आहे़त. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़. हा प्रकार शहरातील गणेश कॉलनीत घडला. या भांडणात खासदार इम्तियाज जलील यांनी मध्यस्थी करत दोघांना सबुरीचा सल्ला दिला. त्यामुळे या प्रकरणी पोलीस तक्रार झाली नाही.

मनपा गटनेता नासेर सिध्दीकी यांच्या वार्डात महावितरण विभागाकडून मान्सून पूर्व दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे या भागात गेल्या चार दिवसांपासून सतत विज पुरवठा खंडीत होत आहे. सिध्दीकी यांनी महावितरणकडे याबाबत तक्रार नोंदवली. या नंतर महावितरणमध्ये कंत्राटदार असलेले अज्जू नाईकवाडे यांचे भाऊ तय्यब नाईकवाडे हे दुरुस्तीच्या कामासाठी रशिदपुऱ्यात आले होते. त्यांनी नासेर सिध्दीकीला महावितरणकडे तक्रार का केली? म्हणून जाब विचारत वाद घातला. त्यानंतर तय्यब यांच्या सोबत आलेल्या एकाने नासेर यांच्या डोक्यावर हातातील दांडा मारला. त्यामुळे नासेर समर्थकांनी अज्जू यांच्या भावाला माराहण केली.

औरंगाबादेत एमआयएम नागरसेवकांमध्ये मारामारी,

या प्रकारणाची माहिती मिळाल्यानंतर अज्जू नाईकवाडे आणि त्यांचा भाचा अर्शद नाईकवाडे हे नासेर यांच्या वॉर्डात पोहचले. त्यांनी नासेर सिध्दीकीला शिवीगाळ करत आरडा-ओरडा सुरू केला. सिध्दीकी समर्थकांनी अर्शद आणि अज्जू नाईकवाडे यांच्यावर हल्ला चढवला.

तय्यब नाईकवाडे हे महावितरणचे कंत्राटदार आहेत. त्यांच्या कामामध्ये नासेर सिध्दीकी हे कमिशन मागत होते, ही बाब भावाने सांगितल्यानंतर मी त्यांची समजूत घालण्यासाठी पुतण्या अर्शद याला घेऊन रशीदपुऱ्यात गेलो होतो. तेथे आमच्यावर नासेर आणि त्यांच्या समर्थकांनी हल्ला केला, असा आरोप एमआयएम नगरसेवक अज्जू नाईकवाडे यांनी केला.

माझ्या वार्डात गेल्या अनेक दिवसांपासून वीज पुरवठा सुरळीत होत नाही. दोन दिवसांपूर्वी अचानक विजेचा दाब वाढल्याने अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाली. भर उन्हाळ्यात लाईट बंद होत असल्याने मी महावितरण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यामुळे तय्यब नाईकवाडेनी वाद घातला व त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तीने माझ्यावर हल्ला केला. त्यामुळे माझेही समर्थक चिडले आणि त्यांनी मारामारी सुरू केली, असे मनपा गटनेता नासेर सिध्दीकी यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.