ETV Bharat / state

शेतकऱ्यांच्या दिवाळीचे काय? राज्य सरकारची घोषणा हवेतच; अजूनही नुकसानभरपाई नाही

author img

By

Published : Nov 4, 2021, 8:10 AM IST

राज्य शासनाने जाहीर केलेल्या दहा हजार कोटींच्या पॅकेजमधून मराठवाड्याला 3 हजार 762 कोटी रुपयांची मदत मिळणार होती. मात्र आता ती 75 टक्क्यानुसार 2 हजार 821 रुपये मिळणार आहे. त्यामुळे 75 टक्क्यांच्या तुलनेत पाहिले तर, जिरायती क्षेत्रासाठी 10 हजार जाहीर करण्यात आल्यापैकी आता 7 हजार 500 रुपये मिळणार आहे. तर बागायतीसाठी 15 हजारांच्या तुलनेत 11 हजार 250 रुपये मिळतीत तसेच फळपिकांसाठी 25 हजाराच्या मदती पैकी आता 18 हजार 750 रुपयेच मिळणार आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान
शेतकऱ्यांचे नुकसान

औरंगाबाद - दिवाळी आली असली तरी सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत अद्याप खात्यात जमा झाली नसल्याचे पाहायला मिळाले. सरकारने जाहीर केलेली मदत म्हणजे फसवणूक असल्याचा आरोप विरोधक करत असताना सरकराने आता शेतकऱ्यांच्या मदत वाटपातही टक्केवारीचा खोडा घातला आहे.

शेतकऱ्यांच्या दिवाळीचे काय? राज्य सरकारची घोषण हवेतच

शेतकऱ्यांना मिळणार 75% टक्केच मदत -

नेहमीच दुष्काळाच्या दृष्टचक्रात अडकणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना यावर्षीही अतिवृष्टीचा सामना करावा लागला. एकट्या मराठवाड्यात 47 लाख शेतकऱ्यांचे 36 लाख 62 हजार 782 हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. सलग तीन वर्षांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे खचला असून, आता त्याला सरकारच्या भरीव मदतीची अपेक्षा होती. पण नेहमीप्रमाणे सरकराने यावेळीही तुटपुंजी मदत जाहीर केली. त्यामुळे किमान या मदतीने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल, अशी अपेक्षा असताना सरकराने आता शेतकऱ्यांच्या मदत वाटपातही टक्केवारीचा खोडा घातला असून, शेतकऱ्यांना आता 75 टक्केच मदत मिळणार आहे. नांगरनी पासून तर पिक जोमात येईपर्यंत 15 हजारांपेक्षा अधिक एकरी खर्च आला, मात्र अतिवृष्टीमुळे शेतात पाणीच-पाणी झाल्याने पिकाच मोठं नुकसान झाले, अति पावसामुळे लागवड कमी झाली असून त्यावर रोग पडले आहे, हतबल झालेल्या मोगल यांना आता सरकाराच्या मदतीची अपेक्षा होती, पण सरकारे तुटपुंजी मदत जाहीर करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले, एवढच नाही तर आता घोषणा केलेली मदत सुद्धा मिळत नसल्याने दिवाळी कशी साजरी करावी असा प्रश्न त्यांना पडला आहे.

राज्य सरकारने अशी केली होती मदत -

राज्य शासनाने जाहीर केलेल्या दहा हजार कोटींच्या पॅकेजमधून मराठवाड्याला 3 हजार 762 कोटी रुपयांची मदत मिळणार होती. मात्र आता ती 75 टक्क्यानुसार 2 हजार 821 रुपये मिळणार आहे. त्यामुळे 75 टक्क्यांच्या तुलनेत पाहिले तर, जिरायती क्षेत्रासाठी 10 हजार जाहीर करण्यात आल्यापैकी आता 7 हजार 500 रुपये मिळणार आहे. तर बागायतीसाठी 15 हजारांच्या तुलनेत 11 हजार 250 रुपये मिळतीत तसेच फळपिकांसाठी 25 हजाराच्या मदती पैकी आता 18 हजार 750 रुपयेच मिळणार आहे.

दिवाळीपूर्वी मदत नाहीच -

शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून अतिवृष्टी नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं होते. मात्र अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरील बँक आणि महसूल विभागाच्या गोंधळात शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळण्याची अपेक्षा कमीच आहे. त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांची दिवाळी कडूच होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाला आहे. त्यामुळे सरकारकडून नुकसान भरपाईची घोषणा करण्यात आली होती. तसेच ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हातात पडेल अशी अपेक्षाही होती. पण प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे दिवाळीपूर्वी मदत मिळणे शक्य दिसत नाही.

राज्य सरकारचा नियोजन शून्य कारभार -

शेतकऱ्यांना मदत करताना राज्य सरकारचा नियोजन शून्य कारभार असल्याची टीका केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ भागवत कराड यांनी केली. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावं लागलं. राज्य सरकारने दहा हजार हेक्टरी मदत जाहीर केली. पन्नास हजार प्रती हेक्टर मदत द्यायला पाहिजे अशी मागणी आम्ही केली होती, दिलेली मदत ही तुटपुंजी आहे. राज्य सरकार हे नियोजनशून्य सरकार असून दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत मिळायला हवी होती. मात्र तसे झालेले नाही आता दोन दिवसांपूर्वी राज्य सरकार कडून पैसे देण्यात आले असले तरी दिवाळीच्या आधी हे पैसे शेतकऱ्यांना मिळतील का? असा प्रश्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करत असताना आधीच त्याबाबतचे नियोजन करणं गरजेचं होतं मात्र तसं झालं नाही असे देखील डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.