ETV Bharat / state

Savarkar Gaurav Yatra : सावरकर गौरव यात्रेला सुरुवात, यात्रा पूर्वनियोजित - अतुल सावे

author img

By

Published : Apr 2, 2023, 9:15 PM IST

Updated : Apr 2, 2023, 9:26 PM IST

भाजपने संभाजीनगरच्या सावरकर चौकातून सावरकर गौरव यात्रेला सुरुवात केली आहे. तर दसरीकडे महाविकास आघाडीची संस्कृतीक मंडळाच्या मैदानावर सभा होत आहे. आमची सावरकर गौरव यात्रा आगोदरच नियोजीत होती. राज्याच्या सर्व मतदार संघात यात्रा जाणार आहे. त्यामुळे विरोधकांनी आगोदर अभ्यास करावा असे आमदार अतुल सावे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Savarkar Gaurav Yatra
Savarkar Gaurav Yatra

सावरकर गौरव यात्रा पूर्वनियोजित - अतुल सावे

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत असताना, सावरकर चौकात भाजपने सावरकर यात्रेला सुरुवात केली. भाजप नेते केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, राज्याचे मंत्री अतुल सावे, शिंदे गटाचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या उपस्थितीत सावरकर यात्रेला सुरुवात करण्यात आली. आमची यात्रा आधीपासूनच निर्धारित आहे आणि फक्त छत्रपती संभाजीनगर मध्ये नव्हे तर, राज्यातील 288 मतदारसंघात यात्रा होत आहे. त्यामुळे त्यांनी आधी अभ्यास करावा अशी टीका अतुल सावे यांनी महाविकास आघाडीवर केली.

जलील यांनी स्वतःच्या पक्षातील गुन्हेगार शोधावे : सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे महाविकास आघाडीची सभा होत असताना भाजप आणि शिंदे गट शिवसेनेने सावरकर यात्रा सुरू केल्याबाबत खासदार इम्तियाज जलील यांनी ही गुंडगिरी असल्याचा आरोप केला. त्यावर भाजप नेते अतुल सावे यांनी प्रत्युत्तर दिलं खासदार यांच्या जलील यांनी स्वतःच्या पक्षात गुन्हेगार वृत्तीचे किती लोक आहेत. त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत. हे तपासावं त्यादिवशी दंगल होत असताना तुम्ही तिथे होता, मग दंगल कशी झाली? असा प्रश्न देखील अतुल सावे यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडी आणि खासदार यांच्या जलील या लोकांनी रोज अभ्यास करावा म्हणजे नेमकं कोणाचं काय म्हणणं आहे ते कळेल अशी टीका देखील सावे यांनी केली.

अधिकार नसताना नाव बदलले : सावरकर चौकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर भाजप आणि शिंदे गट शिवसेनेच्या वतीने गौरव यात्रेला सुरुवात करण्यात आली. यात शिंदे गटाचे नेते पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या सभेच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो का नाही? बाळासाहेब आपले आहेत. अशा शब्दात त्यांनी टीका केली. 35 वर्षांपूर्वी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांस्कृतिक मंडळ येथे संभाजीनगर असे नामकरण शहराचे केले. मात्र महाविकास आघाडी सरकार असताना अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांनी त्याबद्दल शब्दही काढला नाही. मात्र अचानक खुर्ची जात असताना अधिकार नसतानाही संभाजीनगर असे नामकरण हे केले अडीच वर्षे सत्तेत असतानाही ते नामकरण करू शकले नाही. मात्र सत्ता बदल होताच, पहिल्याच टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर त्यांनी केले अशी टीका संदिपान भुमरे यांनी केली.


सहा दिवस गौरव यात्रा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अनेक वेळा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणारे वक्तव्य केले. त्यामुळे सावरकर नेमकी कोण होते त्यांचे कार्य काय होतं याबाबत सर्वसामान्य जनतेला माहिती व्हावी आणि राहुल गांधी किती खोटे बोलतात हे कळावं यासाठी सावरकर गौरव यात्रा काढल्याचं सहकार मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. राज्यात 288 मतदारसंघात ही यात्रा आजपासून सुरू झाली आहे. तर छत्रपती संभाजीनगरच्या तीन मतदारसंघात सहा विभाग करण्यात आले आहेत. रोज एका विभागात ही यात्रा निघणार असून सावरकर यांच्या जीवनावर असणाऱ्या चित्रफित, माहितीपट, पुस्तक आणि इतर साहित्यांच्या माध्यमातून काँग्रेसचे आरोप किती खोटे आहे हे पटवून देणार आहोत असं अतुल सावे यांनी सांगितलं.

हेही वाचा - Sambhajinagar Riots Case : छत्रपती संभाजीनगर दंगल प्रकरण; आतापर्यंत 28 जण अटकेत, तर 50 जणांची ओळख पटली

Last Updated : Apr 2, 2023, 9:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.