ETV Bharat / state

राजू शेट्टींनी केलेले वक्तव्य आमच्यासाठी नसावं - जयंत पाटील

author img

By

Published : Sep 4, 2021, 8:15 PM IST

कन्नडमध्ये पिकांचे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. बेलदरी येथे मातीच्या तलावाची भिंत फुटल्याने या भागात जास्त नुकसान झाले असून या भागातील नुकसानीचा अहवाल सरकारकडे आल्यानंतर सरकार पुढील भूमिका बजावेल, असे जयंत पाटील म्हणाले.

म

औरंगाबाद - राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीतून राष्ट्रवादीने स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव वगळले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा मी करेक्ट कार्यक्रम करेन, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली. शेट्टी यांच्या या वक्तव्यावर जयंत पाटील यांनी शेट्टी यांनी ते वाक्य राष्ट्रवादी साठीच वापरलं हे कशावरून, अशी प्रतिक्रिया मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

बोलताना मंत्री जयंत पाटील

पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी

रविवारी (दि. 4 सप्टेंबर) जयंत पाटील यांनी कन्नड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, कन्नडमध्ये पिकांचे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. बेलदरी येथे मातीच्या तलावाची भिंत फुटल्याने या भागात जास्त नुकसान झाले असून या भागातील नुकसानीचा अहवाल सरकारकडे आल्यानंतर सरकार पुढील भूमिका बजावेल. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जाणार असून जमीन खरडून जाण्याचे निकष ठरवण्यात आले आहेत. त्या निकषांनुसार जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना मदत केली जाईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. बेलदरी येथील पाझर तलाव दुरुस्तीसाठी सूचना दिल्या आहे. त्याचे काम पूर्ण होण्यासाठी 3-4 महिने लागतील, अशी माहिती जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यपालांवर सौम्य भाषेत टीका

मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली नाव राज्यपाल यांनी मान्य करावी, अशी विनंती राज्यपालांकडे करण्यात आली आहे. आम्ही टीका केलेली नाही, नियुक्ती व्हावी यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी भेट घेतली. मी देखील चहा घेऊन आलो. नावे देऊन बराच वेळ गेला आहे. यापूर्वी अशी परिस्थिती कधीच नव्हती. त्यामुळे विनंती केली आहे लवकर नियुक्ती होईल अशी अपेक्षा आहे, अशा सौम्य भाषेत टीका जयंत पाटील यांनी केली.

जावेद अख्तर यांच्याबाबत मौन

जावेद अख्तर यांच्या वक्तव्याबाबत मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. समाजात इतर प्रश्न असतात. त्यामुळे अशा प्रश्नांकडे मी दूर्लक्ष करतो, असे सांगत यांनी अख्तर यांच्या वक्तव्याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला.

निवडणुकीच्या काळात मुद्दा बदलेल

औरंगाबादचे संभाजीनगर करण्याबाबत सुभाष देसाई यांनी हीच ती वेळ असल्याचे सांगितले. मात्र, याबाबत यांच्याशी चर्चा झालेली नाही, असे जयंत पाटील यांनी म्हणाले. निवडणूक अजून लांब आहे, त्यावेळी जे मुद्दे प्रचारात राहतील तेच मुद्दे खरे असतील त्यामुळे तेव्हा पाहू, असे जयंत पाटील यांनी म्हणाले.

हेही वाचा - संतापजनक! मानलेल्या भावाने केला बहिणीवर अत्याचार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.