MLA Prashant Bamb प्रशांत बंब यांना फोनवरुन धमकी देणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

author img

By

Published : Aug 27, 2022, 11:20 AM IST

MLA Prashant Bamb

आमदार प्रशांत बंब MLA Prashant Bamb यांना फोनद्वारे बोललेल्या ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत. त्यापैकी एका शिक्षकाच्या पत्नीने आमदार बंब यांना फोन करून धमकी देऊन अर्वाच्य भाषा वापरून बदनामी केली असल्याचा आरोप बंब समर्थकांनी केला आहे.त्यामुळे लासूरच्या सरपंच मीना पांडव यांच्या तक्रारीवरून गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नजीर शेख हे करत आहेत.

औरंगाबाद आमदार प्रशांत बंब MLA Prashant Bamb यांनी नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात शिक्षक, ग्रामसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालय रहावे असा प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात आमदार प्रशांत बंब यांना फोनवरून जाब विचारून अर्वाच्य भाषेत धमकी दिल्याप्रकरणी शिल्लेगाव पोलिसात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंब यांनी मुख्यालयी राहण्याचा मुद्दा विधानसभेत मांडला होता विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गंगापूर खुलताबाद चे आमदार प्रशांत बंब यांनी बुधवारी मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी सर्व शिक्षक, ग्रामसेवक, शासकीय, अधिकारी, कर्मचारी यांचे मुख्यालयी वास्तव्य असणे आवश्यक आहे असा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता अनेक शासकीय कर्मचारी अधिकारी व शिक्षक मुख्यालय न राहता घरभाडी उचलून शासनाची फसवणूक करतात असेही ते म्हणाले होते त्यावरून अनेक शिक्षकांनी आमदार प्रशांत बंब यांना फोन करून याविषयी जाब विचारला आहे.

अनेक ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर व्हायरल आमदार प्रशांत बंब यांना फोनद्वारे बोललेल्या ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत. त्यापैकी एका शिक्षकाच्या पत्नीने आमदार बंब यांना फोन करून धमकी देऊन अर्वाच्य भाषा वापरून बदनामी केली असल्याचा आरोप बंब समर्थकांनी केला आहे.त्यामुळे लासूरच्या सरपंच मीना पांडव यांच्या तक्रारीवरून गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नजीर शेख हे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.