ETV Bharat / state

Cabinet Expansion : राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्यात - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

author img

By

Published : Jun 30, 2023, 4:04 PM IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा केला. आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जुलै महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आम्हाला देखील करायचा आहे. मुख्यमंत्री त्याबद्दल निर्णय घेतीलच जुलै महिन्यामध्येचे आम्ही विस्तार करू, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथील विमानतळावर दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर होते यावेळी ते विमानतळावर आले असता त्यांनी माध्यमांची संवाद साधला.

यासाठी दिल्ली वारी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र आणि राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्ताराचा काही संबंध नाही. केंद्राचा कधी होणार हे आम्हाला माहिती देखील नाही. आमचा राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात जास्त रस आहे. राज्यातील अनेक प्रश्न असतात त्यासाठी केंद्राची भेट घ्यावी लागते. त्याचा पाठपुरावा करावा लागतो, या संदर्भातच अनेक बैठक असतात, त्यामुळे केंद्रात जावे लागते असे फडणवीस म्हणाले. दिल्लीला जाण्यापूर्वी शिंदे -फडणवीस यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली होती. तसेच दिल्लीला जाण्यापूर्वी मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुप्त भेट झाली होती.

मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला मुर्हूत लागत नव्हता. आता शेवटी मंत्रिमंडळ विस्ताराला मुर्हूत लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा मंत्रिमंडळ विस्ताराविषयी होता. परंतु फणवीस आपला दिल्ली दौरा राज्यातील इतर कामांच्या प्रश्नांसाठी होता सांगत आहेत. परंतु हा दौरा मंत्रिमंडळ विस्ताराविषयीच होता, असे अनेक जाणकार सांगत आहेत. काल उशिरा रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही पक्षाची एक समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना दुसरीकडे राज्यात शिंदे शिवसेना गट व भाजप पक्षाची एक समन्वय समिती स्थापन करण्याचा विचार बऱ्याच दिवसापासून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आहे. त्या अनुषंगाने भाजपचे तीन ते पाच त्याचबरोबर शिवसेनेचे (शिंदे गट) सुद्धा तीन ते पाच नेते या समितीत असतील असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा -

  1. Googly War : शरद पवारांच्या गुगलीवर कोण झाले बोल्ड? संजय राऊतांनी थेटच सांगितले....
  2. Shinde Fadnavis Government one Year : शिंदे फडणवीस सरकारची वर्षपूर्ती, मात्र आगामी काळ असणार मोठा कठीण ?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.