ETV Bharat / state

Aurangabad Crime : शिपाईपदाच्या परीक्षेत डमी परीक्षार्थी; पोलिसांनी केली दोघांना अटक

author img

By

Published : Feb 3, 2023, 12:00 PM IST

नऊ लाख रुपयांच्या बदल्यात परीक्षेत डमी उमेदवार बनून युवक गेल्याची धक्कादायक घटना चिकलठाणा परीक्षा केंद्रावर उघड झाली. मात्र या युवकास सुरक्षारक्षकाने परीक्षेदरम्यान हॉलमध्ये अंगझडती घेताना पकडले. त्यामुळे परीक्षेचा पेपर देण्याऐवजी त्याच्यासह परीक्षार्थीच्या हातात बेड्या पडल्याचा प्रकार शिपाईपदाच्या परीक्षेत घडला.

Aurangabad Crime
डमी परीक्षार्थी

औरंगाबाद : अविनाश सजन गोमलाडू, असे या डमी विद्यार्थ्याचे नाव आहे. तर विकास शाहूबा शेळके असे मुळ विद्यार्थ्याचे नाव आहे. या दोघांविरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन्ही युवकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. डमी उमेदवार अविनाशची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे ४ हजार रुपये किमतीचे एटीएम ट्रान्समीटर, ब्लूटुथ डिव्हाईस, मख्खी एअर फोन, मोबाइल आढळून आला. त्याशिवाय मूळ उमेदवाराची कागदपत्रेही अविनाशकडे सापडली.

आढळली हायटेक सामग्री : हायटेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तो बाहेरुन प्रश्नाची उत्तरे मागविणार होता. गुन्हा नोंदवताच एम सिडको पोलीसांनी डमी परीक्षार्थी अविनाश याला अटक केली आहे. मूळ परीक्षार्थी विकास शेळके याला देखील अटक केली. नंतर त्यांना तपास अधिकारी उपनिरीक्षक सचिन जाधव यांनी दोघांना न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली. औरंगाबादमध्ये नेहमीच वेगवेगळे गुन्हे घडत असतात. या घटनेने आणखी त्यात भर घातली आहे.



विकासच्या नावावर अविनाश डमी उमेदवार : केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, एसआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल, आसाम रायफल्समध्ये शिपाई पदासाठीची परीक्षा एमआयडीसी सिडकोतील आयऑन डिजिटल झोनमध्ये बुधवारी आयोजित करण्यात आली होती. हॉल तिकीट पाहून उमेदवारांना हॉलमध्ये सोडण्यात येत होते. या केंद्रावर 533 परीक्षार्थी आले होते. यात उमेदवारांची अंगझडती घेण्यासाठी एक सुरक्षारक्षक आतमध्ये गेला होता. तेव्हा त्याला एका परीक्षार्थीची सारखी हालचाल दिसून आली. त्या उमेदवाराची बारकाईने चढती घेतली असता, त्याच्याकडे अत्याधुनिक यंत्र सापडली. हॉल तिकीटवर वेगळाच फोटो दिसून आला. त्यावेळी विकासच्या नावावर अविनाश डमी उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले.


असा ठरला व्यवहार : या घटनेतून केंद्र व व्यवस्थापक वैभव पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार परीक्षा देण्यासाठी आलेला अविनाश आणि मूळ विद्यार्थी विकास यांची एकमेकांसोबत ओळख नव्हती. मात्र एका परीचीताकडून विकासला अविनाश विषयी माहिती मिळाली. शिपाई पदाची परीक्षा देण्यासाठी नऊ लाख रुपये देण्याचा ठरले, परीक्षा दिल्याच्या दिवशी दहा हजार आणि उर्वरित पैसे पास झाल्यावर समोर आले. ही घटना चिकलठाणा येथील परीक्षा केंद्रावर घडली.

हेही वाचा : Pune Accident: गुगल मॅपवरुन रस्ता शोधण्याचा प्रयत्न बेतला जीवावर; भरधाव ट्रकची धडक लागून तरूणीचा जागीच मृत्यु

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.