ETV Bharat / state

Marathwada University Election : पदवीधर गटातील अधिसभेच्या दहाही जागांचे निकाल जाहीर, सलग 45 तास मतमोजणी

author img

By

Published : Dec 1, 2022, 9:32 AM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ( Dr Babasaheb Ambedkar Marathwada University ) पदवीधर गटातील सर्व दहाही जागांचे निकाल बुधवारी टप्प्याटप्प्याने जाहीर ( 10 Seats Results Declare In Graduate Group ) झाले. विजयी उमेदवारांना मा. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते विजयी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

Etv Bharat
Etv Bharat

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ( Dr Babasaheb Ambedkar Marathwada University ) पदवीधर गटातील अधिसभा निवडणुकीची मतमोजणी सलग 46 तासानंतर बुधवारी दि.30 रोजी संपली. पदवीधर गटातील सर्व दहाही जागांचे निकाल बुधवारी टप्प्याटप्प्याने जाहीर ( 10 Seats Results Declare In Graduate Group ) झाले. विजयी उमेदवारांना मा. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते विजयी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

विजयी झाल्याचे प्रमाणपत्र : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर गटातील अधिसभा निवडणुकीसाठी 50.75 टक्के मतदान झाले होते. एकूण 36 हजार 254 मतदारांपैकी 18 हजार 400 पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजावला. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले व कुलसचिव डॉ भगवान साखळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभागातील बॅडमिंटन सभागृहात सोमवार, मंगळवारी व बुधवारी मतमोजणी झाली. मतमोजणीसाठी प्रत्येक शिफ्टला 40 प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी असे एकूण 120 जण नेमण्यात आले. अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. प्रशांत अमृतकर, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.संजय सांभाळकर, डॉ.आनंद देशमुख हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. या निवडणूकीत सुनील यादवराव मगरे, सुनील पुंडलिकराव निकम, राऊत सुभाष किशनराव, पूनम कैलास पाटील व दत्तात्रय सुंदरराव भांगे हे राखीव गटातून निवडणुन आले.

खुल्या गटातील विजयी उमेदवार : या निवडणुकीत खुल्या गटासाठी झालेल्या 18 हजार 400 मतातून 16 हजार 472 मते वैध तर 1968 मते अवैध ठरली. पहिल्या पसंतीच्या फेरीत एकही उमेदवार 2 हजार 746 हा विजयासाठीचा आवश्यक कोटा पूर्ण करु शकले नाहीत. डॉ.नरेंद्र काळे हे बाराव्या फेरीत तर जहुर शेख खालेद हे 18 व्या कोटा पूर्ण करुन विजयी झाले. तर भारत खैरनार 2676, योगिता होके पाटील 2173 व हरिदास सोमवंशी हे 1272 मते घेऊन विजय ठरले. हे तीनही उमेदवार कोटा पूर्ण करु शकले नाहीत. तथापि मतमोजणीच्या 24 व्या फेरीनंतर पहिल्या उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले.

निवडणुकच्या यशस्वीत सर्वांचेच योगदान : मा. कुलगुरु पदवीधर अधिसभेच्या मतदार नोंदणीपासून ते निवडणुक प्रक्रिया मतमोजणी ते निकाल या सर्व टप्प्यावर सर्व घटकांचे मोलाचे योगदान व सहकार्य लाभले. विद्यापीठातील कर्मचारी, प्राध्यापक, प्रशासनातील घटक, उमेदवार, पोलीस प्रशासन, माध्यमे यांचे सहकार्य लाभले. त्यामुळे पारदर्शक व निर्विवादपणे तसेच शांततेत मतदान पार पडले. पुढील टप्प्यातही ही प्रक्रिया याप्रमाणेच पार पडू, असे मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले.

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.