ETV Bharat / state

औरंगाबादकरांना पाण्यापेक्षा नामकरणाचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो का? -अॅड.प्रकाश आंबेडकर

author img

By

Published : Jan 17, 2021, 2:48 PM IST

औरंगाबाद शहराचा नामकरण मुद्दा राज्यभर गाजत असताना प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद संभाजीनगर या प्रश्नावर सूचना केली. या नामांतर मुद्द्यावर नागरिकांना काय वाटते, यासाठी औरंगाबाद नावावर शहरवासीयांचे मतदान घ्या.

पाण्यापेक्षा नामकरणाचा मुद्दा महत्त्वाचा

औरंगाबाद - औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरुन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. शहराचे नामांतर करुन संभाजीनगर करण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्यांनी सांगावे संभाजी महाराज आणि औरंगाबाद शहराचा काय संबंध? शहरासाठी पाणी प्रश्न गंभीर आहे. अशात औरंगाबादच्या नागरिकांना पाण्यापेक्षा नामकरणाचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो का? असा सवाल अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सुभेदारी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत विचारला.

औरंगाबादकरांना पाण्यापेक्षा नामकरणाचा मुद्दा महत्त्वाचा
नामकरण मुद्यावर मतदान घ्याऔरंगाबाद शहराचा नामकरणाचा मुद्दा राज्यभर गाजत असताना प्रकाश आंबेडकर यांनी एक सूचना केली. या नामांतर मुद्द्यावर नागरिकांना काय वाटते, यासाठी औरंगाबाद नावावर शहरवासीयांचे मतदान घ्या. या मतदानातून लक्षात येईल औरंगाबाद शहरातील किती नागरिक औरंगाबादच्या बाजूने आणि किती नागरी संभाजीनगरच्या बाजूने आहेत.मंत्रीमंडक बैठकीत प्रस्ताव आणावाऔरंगाबादच्या नामांतर मागणीत मुस्लीमविरोधी वास येतो. पालकमंत्री आणि मुख्यमंत्री संभाजीनगरसाठी इतकेच आग्रही असतील तर त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव आणावा. उगाच औरंगाबाद शहरातील नागरिकांना झुलवत बसू नये. जायकवाडी धरण पुर्ण भरलेला असताना शहरात नऊ दिवसात पाणी येते. औरंगाबादकरांना पाण्यापेक्षा नामकरणाचा विषय महत्त्वाचा वाटतो का असा सवालही त्यांनी विचारला.

हेही वाचा - औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत, शिवसेनेचा काँग्रेसला टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.