ETV Bharat / state

Damini App For Lightning Notification : आता वीज पडायच्या आधी 'दामिनी' येणार मदतीला, केंद्र सरकारने विकसीत केले अ‍ॅप

author img

By

Published : May 29, 2022, 11:28 AM IST

Updated : May 29, 2022, 11:51 AM IST

पावसाळ्यात वीज पडून जीवित आणि वित्त हानी अधिक होते. आता जीवित हानी होऊ नये यासाठी 'दामिनी' ( Damini App ) धावून येणार आहे. भारत सरकारने ( Central Government Damini Application ) हे अ‍ॅप तयार केले आहे.

Damini App For Lightning Notification
Damini App For Lightning Notification

औरंगाबाद - पावसाळ्यात वीज पडून जीवित आणि वित्त हानी अधिक होते. आता जीवित हानी होऊ नये यासाठी 'दामिनी' ( Damini App ) धावून येणार आहे. दामिनी म्हणजे पोलिसांचे महिला मदत पथक अस वाटत असेल, किंवा ही दामिनी एखादी महिला असेल असं वाटत असेल तर, तसं नसून भारत सरकारने ( Central Governmenr Damini Application ) तयार केलेलं एक अ‍ॅप आहे, जे वीज पडण्याच्या 15 मिनिटं आधी आपल्याला त्या संबंधी सूचना देणार आहे.

मदतीला धावणार 'दामिनी' अ‍ॅप- जून ते सप्टेंबर महिला तर कुठे नोव्हेंबर महिन्यापर्यंत पावसाच्या सरी कोसळत असतात. मात्र, त्यावेळी विजेचा कडकडाट अनेक वेळा सोबत असतो. अशा स्थितीत वीज पडून अनेक वेळा, मनुष्य आणि जनावरांची जीवित हानी होते. त्याचा आकडा अधिक असतो. त्यामुळेच भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने दामिनी नावाच अँप तयार केलं आहे. हे अँप 30 ते 40 किलोमीटर अंतरावर कुठे वीज पडेल याबाबत 15 मिनिटं आधी इशारा देणार आहे. जीपीएस प्रणालीवर हे अँप कार्यान्वित असणार असून पावसाळ्यात ठराविक वेळेला हे अँप वीज पडणार आहे का? किंवा नाही या बाबत अलर्ट देत राहणार आहे.

सर्वांना घेता येईल दामिनी अ‍ॅप - वीज पडण्याची माहिती मिळणे सरकारी यंत्रणांना आवश्यक असते. त्यामुळे सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे अॅप मोबाईलमध्ये असायला हवं असे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. जेणे करून आपल्या परिसरात वीज पडणार असल्यास काही पावलं उचलून नागरिकांना सतर्क करता येईल. त्याच बरोबर सर्व सामान्य व्यक्तीदेखील हे अॅप आपल्या मोबाईल मध्ये घेऊ शकतो. प्लेस्टोरमध्ये हे अप्लिकेशन सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यामुळे सरकारी यंत्रणा आपलं काम करेलच, मात्र सर्वसामान्यांना देखील वीज पडण्यापासून सतर्क राहता येईल. अशी माहिती केंद्र सरकार कडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - Fourth Standard Boy Rape : धक्कादायक! चौथीतील मुलीवर आठ वर्षाच्या वर्गमित्राचा बलात्कार

Last Updated :May 29, 2022, 11:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.