ETV Bharat / state

एमआयएमचा बाप मीच; खैरेंचे जलील यांना प्रतिउत्तर

औरंगाबादचे पश्चिमचे उमेदवार संजय शिरसाठ यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या मेळाव्यात औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ही टीका केली आहे.

संपादित छायाचित्र
author img

By

Published : Oct 7, 2019, 8:30 PM IST

Updated : Oct 7, 2019, 8:40 PM IST

औरंगाबाद - मीच शहरात बाप आहे, रझाकारांच्या औलादांनी औरंगजेबाला कुठे दफन केले लक्षात ठेवावे, अशी टीका शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर केली आहे. इम्तियाज जलील यांनी पुणे येथे सेना-भाजपला वाटले नव्हते की मी निवडणून येईल, मी त्यांचा बाप आहे, अशी टीका केली होती. या टीकेला खैरे यांनी शिवसेना स्टाईल उत्तर दिले आहे.

औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे

एमआयएम औरंगाबादेत आल्यापासून शहरात दंगली झाल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. औरंगाबादचे पश्चिमचे उमेदवार संजय शिरसाठ यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या मेळाव्यात खैरे यांनी हा आरोप केला. खासदार म्हणून चारवेळा निवडून आलो. मात्र, शहरात कधीही जातीय तेढ निर्माण होऊ दिली नाही. मात्र, शहरात एमआयएम आणि इम्तियाज जलील आल्यापासून शहरातील जातीय तणाव वाढला आहे. लोकसभेत माझा पराभव झाल्यावर आनंद व्यक्त व्यक्त करणाऱ्यांना देखील माझ्या पराभवच दुःख असल्याची भावना चंद्रकांत खैरे यांनी बोलून दाखवली.

हेही वाचा - महाआघाडीच्या 'शपथनाम्या'त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी; केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण

औरंगाबाद शहरात जो विकास झाला त्यासाठी शिवसेना झटली. शिवसेनेला जातीवादी म्हणण्यात आले. मात्र, शिवसेने जातीवाद केला नाही. खासदार म्हणून काम करत असताना दिल्लीत अनेकजण मदतीसाठी येत होते. सर्वांना मदत केली. मात्र, लोकसभेत अनेकांनी हेतुपुरस्कार चुकीचा प्रचार केल्याने दगा झाला. महानगर पालिकेच्या काही समस्या होत्या त्या आता दूर झाल्या आहेत. त्यामुळे लोकसभेला झाले ते आता होणार नसल्याचा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने शेतकऱ्यांना केलेल्या मदतीचा मुद्दा घेऊन ग्रामीण भागात मतदारांसमोर जाणार आहोत. शिवसेनेने लोकांच्या हितासाठी काम केले आणि करत राहणार असल्याचा विश्वास जनतेला असल्याने आम्हाला यावेळच्या निवडणुकीत यश मिळेल, असा विश्वास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा -शरद पवारांचा उद्यापासून उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात निवडणूक प्रचार दौरा

Intro:मीच शहरात बाप आहे, रझाकारांच्या औलादांनी औरंगजेबाला कुठं दफन केलं लक्षात ठेवावं अशी टीका शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर केली. इम्तियाज जलील यांनी दिवसांपूर्वी पुणे येथे सेना - भाजपाला वाटलं नव्हतं कि मी निवडणून येईल मी त्यांचा बाप आहे अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली होती या टीकेला खैरे यांनी शिवसेना स्टाईल उत्तर दिल. Body:एमआयएम औरंगाबादेत आल्यापासून शहरात दंगली झाल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलाय. औरंगाबादचे पश्चिमचे उमेदवार संजय शिरसाठ यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या मेळाव्यात खैरे यांनी आरोप केलाय. खासदार म्हणून चार वेळा निवडून आलो मात्र शहरात कधीही जातीय ठेध निर्मण होऊ दिला नाही. मात्र शहरात एमआयएम आणि इम्तियाज आल्यापासून शहरातील जातीय तणाव वाढला आहे. लोकसभेत माझा पराभव झाल्यावर आनंद व्यक्त व्यक्त करणाऱ्यांना देखील माझ्या पराभवच दुःख असल्याची भावना चंद्रकांत खैरे यांनी दाखवली. Conclusion:औरंगाबाद शहरात जो विकास झालाय त्यासाठी शिवसेना झटली. शिवसेनेला जातीवादी म्हणण्यात आलं मात्र जातीवाद केला नाही. खासदार म्हणून काम करत असताना दिल्लीत अनेक जण मदतीसाठी येत होते सर्वाना मदत केली मात्र लोकसभेत अनेकांनी हेतुपुरस्कार चुकीचा प्रचार केल्याने दगा झाला. महानगर पालिकेच्या काही समस्या होत्या त्या आता दूर झाल्या आहेत. त्यामुळे लोकसभेला झालं ते आता होणार नसल्याचा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत शिवसेना शेतकऱ्यांना केलेल्या मदतीचा मुद्दा घेऊन ग्रामीण भागात मतदारांसमोर जाणार आहोत. शिवसेनेने लोकांच्या हितासाठी काम केले आणि करत राहणार असल्याचा विश्वास जनतेला असल्याने आम्हाला यावेळच्या निवडणुकीत यश मिळेल असा विश्वास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.
byte - चंद्रकांत खैरे - शिवसेना नेते
Last Updated : Oct 7, 2019, 8:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.