ETV Bharat / state

Tourist Places in India : देशात सुरू होणार 365 दिवस पर्यटन, केंद्र सरकारने सुरू केल्या उपाययोजना

author img

By

Published : May 22, 2023, 7:38 PM IST

जगभरातील सर्वात चांगले पर्यटन स्थळे देशात असल्याचे मानले जाते. याचाच फायदा घेत 365 दिवस पर्यटन अशी संकल्पना देशात लवकरच राबवली जाणार आहे. त्यासाठी दिल्ली येथे पर्यटक व्यावसायिक आणि उद्योजक यांची एक महत्त्वाची बैठक घेण्यात येणार आहे. याचाच आधार घेत छत्रपती संभाजीनगर येथे रात्रीचे पर्यटन सुरू करावे अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

Tourist places in India
भारत देशातील पर्यटन स्थळे

माहिती देताना पर्यटन व्यावसायिक

छत्रपती संभाजीनगर : भारतात पर्यटनाची अनेक स्थळे आहेत. भारतात सर्वात प्राचीन अशी धार्मिक स्थळ जगाला आकर्षित करत असतात. मात्र पर्यटक आल्यानंतर ते विशिष्ट भागातून जातात आणि परत मायदेशी परततात. मात्र तसे न करता 365 दिवसांचा पर्यटन सुरू राहावे यासाठी आता केंद्र सरकारच्या वतीने पावले उचलली जात आहेत.

देशात सुरू होणार 365 दिवस पर्यटन: पूर्वी इंग्रज देशात राहत असताना ते उन्हाळ्यात दार्जिलिंग, कुल्लू मनाली, कश्मीर या बाजूला जाऊन राहत असत आणि त्यानंतर पुन्हा वेगळा भागात ते जात असायचे. त्याच पद्धतीने पर्यटन स्थळांची माहिती गोळा करून आलेला पर्यटक जास्तीत जास्त दिवस कसा देशात राहू शकेल, याबाबत प्रयत्न केले जात आहेत. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. यामध्ये गुंतवणूकदार उद्योजक यांना बोलवण्यात आले आहे. जास्तीत जास्त गुंतवणूक करून त्यातून पर्यटन विकास कसा करता येईल, यावर लक्ष केंद्रित केल जात असल्याची माहिती औरंगाबादचे पर्यटन व्यावसायिक जसवंत सिंग यांनी सांगितले.

365 दिवस पर्यटन अशी संकल्पना देशात लवकरच राबवली जाणार आहे. यासाठी आता केंद्र सरकारच्या वतीने पावले उचलली जात आहेत. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. यामध्ये गुंतवणूकदार उद्योजक यांना बोलवण्यात आले आहे. - पर्यटन व्यावसायिक जसवंत सिंग



शहरात सुरू करा रात्रीचे पर्यटन: देशात 365 दिवसाचा पर्यटन सुरू करण्याची तयारी केंद्राच्या वतीने करण्यात येत आहे. त्यातच शहरात देखील रात्रीचे पर्यटन सुरू करण्याची मागणी पर्यटन व्यवसायिकांनी केली आहे. अजिंठा, वेरूळ, बीबीचा मकबरा, देवगिरी किल्ला अशी पर्यटन स्थळ जिल्ह्यात असली, तरी रात्रीच्या वेळी एकही पर्यटन स्थळ सुरू नसल्याचे पाहून अनेक पर्यटक परतीचा मार्ग निवडतात. रात्री त्यांना फिरण्यासाठी योग्य जागा असली तर पर्यटक शहरात वास्तव्य करेल आणि त्यातून अर्थचक्र वाढेल. त्यामुळेच रात्रीचे पर्यटन स्थळ ठेवावे अशी मागणी करण्यात आली. यात बीबीचा मकबरा, दौलताबाद किल्ला आणि वेरूळ लेणीला रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाई करून चांगल्या पद्धतीने पर्यटकांना आकर्षित करू शकतात. त्यामुळे किमान ही पर्यटन स्थळ तरी रात्री सुरू ठेवावी अशी मागणी केल्याचे जसवंत सिंग यांनी सांगितले.


शहरातील अजिंठा, वेरूळ, बीबीचा मकबरा, देवगिरी किल्ला याठिकाणी रात्रीचे पर्यटन सुरू करण्याची मागणी पर्यटन व्यवसायिकांनी केली आहे. - जसवंत सिंग


शहर पर्यटनासाठी बस सुरू करा: छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद शहराला दरवाजांचे शहर अशी ओळख आहे. जवळपास 52 दरवाजांनी हे शहर पूर्वी सजलेल असायचे, कालांतराने इतिहासाचा काही भाग नामशेष झाला. सद्यस्थितीत 12 दरवाजे भक्कम उभे आहेत. त्यांच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेने पूर्ण केले आहे. मात्र हे दरवाजे बघण्यासाठी पर्यटक येत नाही, कारण त्याबाबतचे महत्व कोणीही पटवून देत नाही. मात्र आता g20 च्या निमित्ताने सर्व दरवाजांना आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे हे सर्व दरवाजे पर्यटकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकते, म्हणून रात्रीचा पर्यटन सुरू ठेवण्यासाठी एक विशेष बस सुरू करण्याची मागणी पर्यटन व्यावसायिकांनी केली आहे. ही बस शहरातून फेरफटका मारेल आणि दरवाजांचे वैभव जगाला दाखवेल. यामुळे व्यवसायात वृद्धी होईल आणि शहराचे नाव इतिहासात आणखीन नव्याने घेतले जाईल असे, मत पर्यटन व्यावसायिक जसवंत सिंग यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा -

  1. Extortion Demand by Blackmailing छत्रपती संभाजीनगरमध्ये केली जात आहे उद्योजकांकडून खंडणीची मागणी उद्योग टिकवण्याचे आव्हान
  2. HSC Exam उत्तर पत्रिकेत हस्ताक्षर बदल बोर्डाने पाठवली नोटीस
  3. Kalicharan Maharaj News समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने कालीचरण महाराजांसह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा भाजपने फेटाळले आरोप
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.