ETV Bharat / state

मांजामुळं नागरिकांचा जीव धोक्यात, औरंगाबाद खंडपीठानं पोलिसांना दिले 'हे' महत्त्वाचे आदेश

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 10, 2024, 10:43 AM IST

High Court Order on Manja
High Court Order on Manja

High Court Order on Manja : दिवसेंदिवस नायलॉन मांजामुळं होणाऱ्या दुर्घटनांमध्ये वाढ होत आहे. याची औरंगाबाद खंडपीठानं गंभीर दखल घेत पोलिसांना कोंबिंग ऑपरेशन राबण्याचे आदेश दिले आहेत.

छत्रपती संभाजीनगर High Court Order on Manja : संक्रांतीच्या काळात पतंग उडवताना नायलॉन मांजामुळं अनेक जण जखमी होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. याबाबत वारंवार माध्यमात आणि समाज माध्यमांवर माहिती मिळते. औरंगाबाद खंडपीठानं गंभीर दखल ( सू मोटो) घेत राज्यभर कोंबिंग ऑपरेशन राबवा, असे आदेश पोलीस विभागाला देिले आहेत. तसंच घातक असलेला नायलॉन मांजा येतो कुठून, याबाबत गंभीर दखल घ्यावी. जर कोणी माहिती लपवत असेल तर, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, ज्या ठिकाणी हा मांजा आढळेल ती मालमत्ता सील करावी असे निर्देशही खंडपीठानं दिले आहेत.

राज्यभर कोंबींग ऑपरेशन राबवण्याचे निर्देश : नायलॉन मांजामुळं अनेक ठिकाणी सर्वसामान्यांना त्रास होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही ठिकाणी नागरिकांचा गळा तर कधी हात कापल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या काही वर्षात अशा घटना सातत्यानं समोर येत असल्यानं, आता घातक असलेल्या नायलॉन मांजाबाबत पोलिसांनी राज्यभर कोंबिंग ऑपरेशन राबवा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय. जी. खोब्रागडे यांनी दिले आहेत. ज्या ठिकाणी नायलॉन मांजा आढळून येईल असे दुकान, घर, खाजगी मालमत्ता ही सर्व ठिकाणं सील करावे. लहान मुलांकडे नायलॉन मांजा आढळून आला तर याबाबत माहिती न दिल्यास त्यांच्या पालकांवरदेखील गुन्हा दाखल करावा. ज्या ठिकाणी पतंग उडवण्यात येत असतील त्या सर्व ठिकाणी जाणीवपूर्वक लक्ष ठेवावे. त्यांच्यावर कारवाई करावी असे आदेश खंडपीठानं दिले आहेत. त्याचबरोबर नायलॉन मांजामुळं गळा कापला जात असताना पोलीस आणि प्रशासनानं कठोर कारवाई करावी. औद्योगिक गोष्टींसाठी नायलॉन मान्यता वापर होतो, ही बाब आता चालणार नसल्याचंही खंडपीठानं सांगितलंय.

मागील आठवड्यात अनेक घटना आल्या समोर : नायलॉन मांजामुळं जखमी होण्याच्या मागील आठवड्यात अनेक घटना समोर आल्या आहेत. यात नाशिकसह छत्रपती संभाजीनगर इथं या घटना तीव्रतेनं दिसून आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागील पाच दिवसांत तीन जणांना नायलॉन मांजामुळं दुखापती झाल्या आहेत. यात गळा आणि हात कापल्याच्या या घटना घडल्या आहेत. दरवर्षी अशाच पद्धतीनं घटना घडत आहेत. संक्रातीनिमित्त पतंग उडवताना दुसऱ्या व्यक्तीची पतंग कापण्याच्या उद्देशानं चांगला मांजा असावा, याकरिता जीवघेणा नायलॉन मांजा वापरला जातो. कटलेल्या पतंगमुळं रस्त्यावर येणारा मांजा मात्र अनेकांच्या आयुष्याची दोर कापायलादेखील कमी करत नाही. याचीच दखल औरंगाबाद खंडपीठानं घेतलीय.

शहरात मंगळवारी एका दुकानदारावर कारवाई : जिल्ह्यात नायलॉन मांजामुळं जखमी होण्याच्या घटना वाढत असल्यानं छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी याबाबत तपास सुरू केलाय. मंगळवारी बजाजनगर इथं नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या राजू गायकवाड या व्यावसायिकाला पोलिसांनी पकडलंय. त्याच्याकडून जवळपास 25 हजार रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे बंडल पोलिसांनी जप्त केलंय. हा मांजा नेमका आला कुठून आणि कोणाकोणाला देण्यात आला, याबाबत आता एमआयडीसी वाळूज पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा :

  1. Nylon Manja: सावधान! नॉयलॉन मांजाची विक्री किंवा खरेदी करत असाल तर होऊ शकते कठोर कारवाई..
  2. awareness to avoid nylon manja : माझ्यावर बेतले ते तुमच्यासोबत नको, नायलॉन मांजाने जखमी झालेल्या पोलिसांकडून जनजागृती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.