ETV Bharat / state

तू फक्त माझ्या पैशाचा-मनाचा वापर केला, असे लिहित प्रियकराने केली आत्महत्या

author img

By

Published : Jun 30, 2021, 3:46 PM IST

Updated : Jul 1, 2021, 5:16 PM IST

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

प्रेयसीने साखरपुडा केल्यामुळे प्रियकराने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना अमरावतीतील रमाबाई आंबेडकर नगरात घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून व्हिडिओही केला आहे.

अमरावती - तू फक्त माझ्या पैशाचा, मनाचा वापर केला आहे.आता मला न्याय हवा आहे. प्रेयसीने दुसऱ्या मुलाशी साखरपुडा केल्याने अमरावती जवळच्या रहाटगाव येथील एका तरुणाने नैराश्येत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी या तरुणाने एक सुसाईड नोट लिहून ठेवली असून व्हिडिओही बनवला आहे, त्यानुसार आत्महत्येस प्रेयसीच जबाबदार असल्याचे त्याने नमूद केले आहे.

आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ

अनुभव धाकडे (वय 33 वर्षे, रा. रमाबाई आंबेडकर नगर, अमरावती), असे मृत तरुणाचे नाव आहे. अनुभव धाकडेचे त्याच्याच परिसरात राहणाऱ्या तरुणीसोबत चार ते पाच वर्षांपासून प्रेम संबंध होते. नेहमी हे दोघे रहाटगाव नजीक असलेला या शेताजवळ भेटत होते. ते लग्नही करणार होते. मात्र, अचानक प्रेयसीने साखरपुडा केल्याची माहिती या युवकाला झाली. त्यामुळे त्याने ज्या झाडाखाली हे तो रोज भेटायचे त्याच झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्याने आत्महत्येपूर्वी माझ्या आत्महत्येला माझी प्रेयसी जबाबदार असल्याची सुसाईट नोट लिहून ठेवली आहे.

काय म्हणतात पोलीस प्रशासन

या आत्महत्येबाबत नांदगाव पेठचे पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर यांनी सांगितले की, या तरुणाने या मुलीलाही धमकी दिली. तिचा पाठलाग केला तिची लग्न करण्याची इच्छा नसतानाही हा दिला लग्न करण्यासाठी आग्रह करत होता. सोबतच मृत्यूनंतरसमोर आलेली सुसाईड नोट ही मृताच्या जवळ आढळली नसून ती सुसाईड नोट त्याच्या कुटुंबाने आणून दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

मृत प्रियकरावर 21 जूनला दाखल झाला होता गुन्हा

आत्महत्या केलेला मृत अनुभव याला त्याच्या प्रेयसीचा साखरपुडा असल्याची माहिती कळाली होती. त्यानंतर त्याने त्या गावी जाऊन वाद व धिंगाणा घातल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत अनुभवच्या विरोधात अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांद्वारे 21 तातखेला गुन्हा दाखल झाला होता त्यावेळी त्याची पोलिसांनी समजूत देखील काढली होती.

Last Updated :Jul 1, 2021, 5:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.