ETV Bharat / state

बच्चू कडुंची 'राहुटी'... विविध शासकीय कागदपत्रांची कामे एकाच मंडपात

author img

By

Published : Jan 30, 2020, 7:42 PM IST

Updated : Jan 30, 2020, 9:06 PM IST

राज्यमंत्री बच्चू कडू यांचा एक अभिनव उपक्रम सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. शिरगाव कजबा या ठिकाणी बच्चू कडू यांनी लोकांच्या समस्यांचे निराकारण गावातच करता यावे, यासाठी 'राहुटी' या उपक्रमाची सुरुवात केली आहे.

Rajyamantryachi rahuti Bacchu Kadu
राज्यमंत्र्याची राहुटी बच्चु कडू

अमरावती - प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यमंत्र्याची राहुटी, हा कार्यक्रम आपल्या गावात राबवला आहे. मतदारसंघातील शिरजगाव कसबा या गावापासून त्यांनी या उपक्रमाला सुरुवात केली आहे. गावातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या गावातच निकाली काढण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. उपक्रमाच्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

अमरावतीतील शिरजगाव कसबा येथे 'राज्यमंत्र्यांची राहुटी'

हेही वाचा... 'कोरेगाव-भीमा प्रकरणी एनआयए चौकशीचे केंद्राचे पत्र मिळाल्यानंतर पुढील पाऊल उचलणार'

30 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या 15 दिवसांच्या कालावधीसाठी मतदारसंघात हा उपक्रम घेण्यात येत आहे. थेट मंत्री बच्चू कडू लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गावात, घरापर्यंत पोहचले आहेत. यात स्वतः बच्चू कडू मंडपात बसून नागरिकांनी आणलेली कामे समजावून घेत, अधिकाऱ्यांना सांगत आहेत.

हेही वाचा... 'जामिया'त तरुणाचा आंदोलकांवर गोळीबार, कुटुंबीयांना बसला धक्का

यापूर्वी आमदार असतानाही कडू यांच्याकडून हा उपक्रम राबवण्यात येत होता. आता, मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतरही त्यांनी ही सेवा सुरूच ठेवली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू हे आपल्या सेवाव्रत कामासाठी परिचित आहेत. सर्वसामान्य, गरिब अन् दिव्यांग व्यक्तींसाठी ते नेहमीच धावून जातात.

अमरावतीत राज्यमंत्री बच्चू कडू यांचा अभिनव उपक्रम... सर्वसामान्यांसाठी 'राहुटी' उपक्रमाला सुरुवात...

हेही वाचा... हिंगोलीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी फोडले विमा कंपनीचे कार्यालय, ठिय्या आंदोलन सुरू

आमदार असतानाही कडू यांनी आपल्या मतदारसंघात ''आमदाराची राहुटी आपल्या गावात'' ही योजना राबवली होती. हीच योजना आता राज्यमंत्र्याची राहुटी आपल्या गावात, अशी बनली आहे. या उपक्रमात सर्व शासकीय अधिकारी येतात. समस्या घेऊन आलेल्या नागरिकांची कामे येथे होतात. या उपक्रमामुळे आता नागरिकांना शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज नसून गावातच लोकांची कामे होत आहे.

Intro: लोकांच्या समस्येचं निराकरण गावातच, राज्यमंत्री बच्चू कडू यांची 'राहुटी' मंडपाखाली

गावातच समस्या निकाली

अमरावती अँकर

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यमंत्र्याची राहुटी आपल्या गावात हा उपक्रम राबवला आहे, आपल्या मतदार संघातील शिरजगाव कसबा या गावापासून त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे या उपक्रमात गावातील समस्या गावातच निकाली निघत असून यात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी उसळली आहे

30 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या 15 दिवसांच्या कालावधीसाठी मतदारसंघात हा उपक्रम घेण्यात येत असून थेट मंत्री बच्चू कडू लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गावात, घरापर्यंत पोहचले आहेत.यात स्वतः बच्चू कडू हे जागेवर खाली बसून नागरिक घेऊन आलेले कामे समजून घेऊन ते अधिकाऱ्यांना सांगून करून घेत आहे
यापूर्वी आमदार असतानाही कडू यांच्याकडून हा उपक्रम राबविण्यात येत होता. आता, मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतरही त्यांनी ही सेवा सुरुच ठेवली आहे.राज्यमंत्री बच्चू कडू हे आपल्या सेवाव्रत कामासाठी परिचीत आहेत. सर्वसामान्य, गरिब अन् दिव्यांग व्यक्तींसाठी हे धावून येतात,
आमदार असताना कडू यांनी आपल्या मतदारसंघात ''आमदाराची राहुटी आपल्या गावात'' ही योजना राबवली होती. त्यांची हीच योजना आता राज्यमंत्र्याची राहुटी आपल्या गावात अशी बनली आहे. या उपक्रमात सर्व शासकीय अधिकारी या राहुटी उपक्रमात येत असून नागरिक घेवून आलेले कामे येथे होत आहे विशेष म्हणजे या ठिकाणी झेरॉक्स मशीन, पासफोट फोटो सह अर्ज जागेवर मोफत आहे त्यामुळे आता उपक्रमामुळे आता नागरिकांना शासकीय कार्यालयाचे उंबरठ्यावर जाण्याची गरज नसून गावातच या उपक्रमात लोकांचे कामे होत आहे


बाईट-बच्चू कडू,राज्यमंत्री
121
Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated :Jan 30, 2020, 9:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.