ETV Bharat / state

बैल सजावट स्पर्धेत रंगले चिमुकले

author img

By

Published : Aug 31, 2019, 11:52 PM IST

बैल सजावट स्पर्धेत रंगले चिमुकले

तान्हा पोळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील श्री कॉलनी येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरात बैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भर पावसात परिसरातील शेकडो चिमुकले सुंदर अशा वेशभुषेत माती आणि लाकडाचे बैल घेऊन स्पर्धेत सहभागी झाले होते.

अमरावती - तान्हा पोळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील श्री कॉलनी येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरात बैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत चिमुकले उत्साहात सहभागी झाले. लहान मुलांसह त्यांच्या पालकांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

बैल सजावट स्पर्धेत रंगले चिमुकले

श्री कॉलनी मंदीर परिसरात गेल्या सात वर्षांपासून तान्हा पोळा आयोजित करण्यात येतो. भर पावसात परिसरातील शेकडो चिमुकले सुंदर अशा वेशभुषेत माती आणि लाकडाचे बैल घेऊन स्पर्धेत सहभागी झाले होते. यावेळी चिमुकल्यांची वेशभूषा आणि बैलांची सजावट यासाठी बक्षिसही प्रदान करण्यात आले.

यावेळी, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत डेहणकर, डॉ.हृषिकेश नागलकर,रश्मी नागलकर,डॉ.अविनाश काळे, मंदिराचे विश्वस्त माणिकराव पाचघरे, मुकुंद बर्गी,प्रदीप ठाकरे आदी उपस्थीत होते. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शिल्पा पाचघरे, संध्या देशमुख,श्रुती जोशी,श्वेता मामुरकर, वैष्णवी देऊळकर, शितल वाघमारे आदींनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

Intro:तान्हा पोळ्याच्या पर्वावर श्री कॉलनी येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरात आयोजित बैल सजावट स्पर्धेत सेटवर चिमुकले उत्साहात सेटवर चिमुकले उत्साहात सहभागी झालेत. लहान मुलांसह त्यांचे पालकही या स्पर्धेत उत्साहात सहभागी झालेत.


Body:श्री कॉलनी मंदीर परिसरात गत सात वर्षांपासून तान्हा पोळा आयोजित करण्यात येतो. यावर्षी पाऊस असतानाही परिसरातील शेकडो चिमुकले सुंदर अशा वेशभुशेत पोळा उत्साहात आपल्या माती आणि लाकडाचे बेल घेउन सहभागी झाले. चिमुकल्यांसह त्यांचे आई,वडील,आजी,आजोबा उत्साहात सहभागी झालेत.
भाजपचे शहर अध्यक्ष जयंत डेहणकर, डॉ.हृषिकेश नागलकर,रश्मी नागलकर,डॉ.अविनाश काळे, मंदिराचे विश्वस्त माणिकराव पाचघरे, मुकुंद बर्गी,प्रदीप ठाकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी चिमुकल्यांची वेशभूषा,बैलांची सजावट यासाठी बक्षिसही देण्यात आले. भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष शिल्पा पाचघरे, संध्या देशमुख,श्रुती जोशी,श्वेता मामुरकर, वैष्णवी देऊळकर, शितल वाघमारे आदींनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.



Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.