ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांची पक्षातून हकालपट्टी

author img

By

Published : Jul 4, 2023, 8:38 PM IST

Maharashtra Political Crisis
संजय खोडके

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उफाळून आलेल्या बंडाच्या (Sanjay Khodke expelled from NCP) पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष संजय खोडके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या संदर्भातील निर्णयाचे पत्र पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी काढले आहे. (Maharashtra Political Crisis)

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संजय खोडके (Sanjay Khodke expelled from NCP) यांना पक्षातून बडतर्फ केले असून त्यांना यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव चिन्ह इत्यादी वापरू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. संजय खोडके यांनी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव चिन्ह वापरले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील जयंत पाटील यांनी दिला आहे. (Maharashtra Political Crisis)


यापूर्वीही झाली होती हाकालपट्टी: महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी दोन जुलैला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी संजय खोडके हे अजित पवार यांच्यासोबत होते. अजित पवार यांच्यासह संजय खोडके यांची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणा विरोधात असल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यापूर्वी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यावर संजय खोडके यांनी पक्षाच्या निर्णयाविरुद्ध भूमिका घेत नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीत विरोध करणार असे जाहीर केले होते. याच कारणावरून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

आमची नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, त्यांची मात्र: राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करून बाहेर पडलेल्या लोकांनी स्थापन केलेली पार्टी ही नोशनल पार्टी आहे. आमची नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. त्यांनी कितीही कारवाया केल्या तरी त्याला काही अर्थ नाही; कारण आपण शरद पवार यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि यापुढे शरद पवारांचा झंजावात आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा पेटून उठेल असा दावाही जयंत पाटील यांनी केला आहे.

9 जणांवर कारवाई: राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून बंडखोरी करत सत्ताधारी पक्षात सहभागी झालेल्या नऊ लोकांवर आम्ही कारवाई करत आहोतच; मात्र उरलेल्या आमदारांसाठी आमच्या पक्षाची बैठक उद्या दुपारी 1 वाजता होणार आहे. या बैठकीला मोठ्या प्रमाणात आमदार उपस्थित राहतील. त्यावेळी आपल्या लक्षात येईल नक्की काय सुरू आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा:

  1. Maharashtra Political Crisis : शरद पवार म्हणतील तेच आम्ही करणार- प्रशांत जगताप
  2. Maharashtra Political Crisis : ....राष्ट्रवादीने सुरुवात केली; केंद्रीय मंत्र्यांची बंडानंतर प्रतिक्रिया
  3. Farmer Support To Sharad Pawar: शरद पवारांना शेतकऱ्याचे समर्थन, बेंदूर निमित्ताने बैलावर प्रतिमा साकारत दर्शवला पाठिंबा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.