ETV Bharat / state

Poisonings Case Amravati : दोन मुलांना विष देऊन आईचा आत्महत्येचा प्रयत्न

author img

By

Published : May 11, 2023, 9:45 PM IST

Poisonings Case Amaravati
विषप्रयोग

आपल्या दोन मुलांना दूधातून विष दिल्यानंतर आईने स्वत: देखील विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना गुरुवार, 11 मे रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. कौटुंबिक कलहातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

अमरावती: आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 28 वर्षीय महिलेसह तिची 11 वर्षीय मुलगी आणि 7 वर्षीय मुलगा यांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तिघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. सदर महिलेचा पती शेतमजुरीचे काम करतो. तो सकाळी शेतात कामावर निघून गेल्यानंतर महिलेने दोघांना दूधातून विषारी औषध प्यायला दिले. त्यानंतर तिघांनी हे विषारी द्रव्य प्राशन केले. काही वेळाने मुलीला उलट्या सुरू झाल्या. ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच धावाधाव करून तिनही मायलेकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


पोलीस करत आहेत तपास: सद्यस्थितीत महिला बयाण देण्याच्या अवस्थेत नसल्याने तिने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा उलगडा अद्याप होऊ शकला नसला. तरी कौटुंबिक कलहातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. कुऱ्हा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

मातेकडून मुलांची हत्या: उत्तर प्रदेश लखनौ जिल्ह्यातील कैराना कोतवाली परिसरात फेब्रुवारी, 2023 मध्ये धक्कादायक घटना घडली. महिलेला चार मुल आहेत. मुलगा साद (8), मुलगी मिसबाह (4) आणि मंताशा (2) अशी त्यांचा नावे आहेत. यांना पाण्यात विष टाकून त्यांची हत्या केली. यामध्ये मुलाचा घरातच मृत्यू झाला, तर दोन्ही मुलींचा मेरठमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?: पणजीठ गावातील रहिवासी असलेल्या मुर्सलीन दिल्लीतील एका फर्निचरच्या दुकानात कारागीर म्हणून काम करतो. घरी पत्नी आणि चार मुले होती. बुधवारी पत्नी सलमाने मुलगा साद (8), मुलगी मिसबाह (4) आणि मंताशा (2) यांना पाण्यात विष टाकून ते पाणी पाजले. तर मुलगी झैनब (9) ही गावी मदरशात शिकण्यासाठी गेली होती. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तीन मुले घरात बेशुद्धावस्थेत पडलेल्या नातेवाईकांना दिसली. याबाबत पत्नी व नातेवाईकांनी मुरसलीन यांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. तिन्ही मुलांना पोलिसांनी सीएचसी कैराना येथे नेले. डॉक्टरांनी सादला मृत घोषित केले. तर दोन्ही मुलींना गंभीर अवस्थेत उच्च केंद्रात पाठवण्यात आले. यानंतर मेरठला नेत असताना वाटेतच मिसबाहचा मृत्यू झाला. मेरठच्या मेडिकलमध्ये सायंकाळी सहाच्या सुमारास मंताशाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा:

  1. Amol Mitkari On SC Verdict : राज्यपालांवर कारवाई व्हायला हवी - आमदार अमोल मिटकरी
  2. Imran Khan Arrested: इम्रान खानच्या अटकेनंतर पाकिस्तानवर काय परिणाम होणार? खास रिपोर्ट
  3. Maharashtra Political Crisis : ठाकरे गटाने शिंदे, फडणवीसांना शिकवला नैतिकतेचा धडा; सरकारनेही दिले उत्तर, 'नैतिकता'चे राजकारण शिगेला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.