ETV Bharat / state

अमरावती : आमदार देवेंद्र भुयार यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

author img

By

Published : Oct 11, 2020, 5:25 PM IST

महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वरुड मोर्शी तालुक्यामध्ये अनेक ट्रान्सफार्मर बंद अवस्थेत आहेत. यामुळे, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत आमदार देवेंद्र भुयार यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच, नादुरुस्त असलेले ट्रान्सफार्मर, तालुक्यातील सर्वच फिडरवरील सिंगल फेज वीज पुरवठा २५ ऑक्टोबरपर्यंत सुरू करण्याचे निर्देश दिले.

आमदार देवेंद्र भुयार यांनी महावितरण अधिकाऱ्यांना धरले धारेवर
आमदार देवेंद्र भुयार यांनी महावितरण अधिकाऱ्यांना धरले धारेवर

अमरावती - युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेन्द्र भुयार यांनी मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, तक्रारी तत्काळ सोडविण्याकरता महावितरण अधिकाऱ्यांची आज (रविवार) आढावा बैठक घेतली. यावेळी मोर्शी वरुड तालुक्यात सोलर प्रकल्प उभारण्याकरता लागणाऱ्या जागेसाठी महसूल विभागाशी समन्वय साधून भूसंपदानाचे काम मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले.

महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वरुड मोर्शी तालुक्यामध्ये १६ केव्हीचे २५ ट्रान्सफार्मर, ६३ केव्हीचे २० ट्रान्सफार्मर, १०० केव्हीचे ४० ट्रान्सफार्मर, असे एकूण ८५ नादुरुस्त ट्रान्सफार्मर बंद अवस्थेत आहेत. यामुळे, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत आमदार देवेंद्र भुयार यांनी अधीक्षक अभियंता अमरावती मंडळ यांच्यासह महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नादुरुस्त असलेले ८५ ट्रान्सफार्मर, मोर्शी वरुड तालुक्यातील सर्वच फिडरवरील रात्रीला सिंगल फेज वीज पुरवठा २५ आक्टोबरपर्यंत सुरू करण्याचे निर्देश दिले. व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व वेळकाढू धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच झालेल्या नुकसानाची भरपाई वसूल करण्यात येईल व त्यांच्यावर कार्यवाही केल्या जाईल, असा इशारा आमदार देवेंद्र भुयार यांनी महावितरण अधिकाऱ्यांना यावेळी दिला.

या बैठकीत मोर्शी वरुड तालुक्यातील नादुरुस्त असलेले ८५ ट्रान्सफार्मर लावण्याचे काम १४ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करणे. वरुड मोर्शी तालुक्यातील सर्व फिडरवरील सिंगल फेज लाईन रात्री सुरू करण्याचे काम २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून आऊट सोर्सिंग पद्धतीने वायरमन तसेच ऑपरेटर पुरवण्याचे कंत्राट काढणे. लोकांच्या घरावरून गेलेल्या वीजलाईन काढणे, शेतकऱ्यांनी वीज घेण्यासाठी केलेले अर्ज लवकर मंजूर करणे, संत्रा झाडे जळणे, जनावरे दगावणे अशा प्रकारच्या नुकसानीचा तत्काळ मोबदला मिळणे, यासह विविध विषयांवर आढावा घेण्यात आला.

हेही वाचा - ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : अमरावती विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मिळाले पूर्ण विषयांची नावे असलेले ओळखपत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.