ETV Bharat / state

अमरावती : मुलीच्या लैंगिक शोषणाप्रकरणी मदरशातील 'त्या' शिक्षिकेला अटक

author img

By

Published : Nov 10, 2019, 9:20 AM IST

मदरशातील मुलीच्या लैंगिक शोषणाप्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी मुफ्ती जिया उल्ला खानला नागपूर मधून अटक केल्यानंतर सह आरोपी असलेली शिक्षिका फिरदोसला सुद्धा मदरशातून अटक करण्यात आली आहे. सहआरोपी फिरदोस हिच्यावर मुलीला आरोपीकडे सोपवण्याचा आरोप आहे. ती मागील चार दिवसांपासून फरार होती.

प्रातिनिधीक छायाचित्र

अमरावती - लालखडी परिसरातील जामेआ नगरातील इस्लामिया बुस्ताने फातेमा लिलबना या मदरशात मदरसा प्रमुखाने मदरशातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे दोन वेळा लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार मागील आठवड्यात पोलीस तक्रार दाखल झाल्यानंतर उघडकीस आला होता. याप्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी मुफ्ती जिया उल्ला खानला नागपूर मधून अटक केल्यानंतर सह आरोपी असलेली शिक्षिका फिरदोसला सुद्धा मदरशातून अटक करण्यात आली आहे.

हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पोलिसांत तक्रार दाखल होण्याच्या काही तास अगोदरच मुख्य आरोपी फरार झाला होता. सहआरोपी फिरदोस हिच्यावर मुलीला आरोपीकडे सोपवण्याचा आरोप आहे. ती मागील चार दिवसांपासून फरार होती.

हेही वाचा - भाजप नेत्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

फिरदोसचे मोबाईल लोकेशन ट्रेस करत पोलीस मध्यप्रदेशपर्यंत गेले होते. परंतु ती तेथून परत अमरावतीच्या मदरशात आली असल्याची माहीती पोलिसांना मिळताच तिला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मदरशात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची हार्डडिक्स, आरोपीचा मोबाईल, कपडे व इतर साहित्य जप्त केले आहे. दरम्यान याप्रकरणी आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Intro:अमरावती:मदरश्यातील मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी. मदरश्यातील त्या शिक्षिकेला अटक.  
-----------------------------------------------
अमरावती अँकर 

अमरावती शहरातील लालखडी परिसरातील जामेआ नगरातील इस्लामिया बुस्ताने फातेमा लिलबनात या मदरस्यात मदरसा प्रमुख मुफ्ती जिया उल्ला खान याने दोन वेळा मदरश्यातीलच एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार मागील आठवड्यात पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर उघडकीस आला होता.त्यामुळे या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली होती.पोलीसात तक्रार दाखल होण्याच्या काही तास अगोदरच फरार झालेला आरोपी मुफ्ती जिया उल्ला खान ला नागपूर मधून अटक केल्यानंतर सह आरोपी असलेली फरार शिक्षिका फिरदोस ला सुद्धा अमरावतीच्या याच मदरश्यातून अटक करण्यात आली आहे.

अमरावती येथील लालखडी परिसरातील मदरश्यात शिकणाऱ्या एका 16 वर्षीय मुस्लिम मुलीला मारहाण करून तिचे लैंगिक शोषण हे करण्यात आले होते.या प्रकरणी मागील आठवड्यातच याची पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.या प्रकरणी मुख्य आरोपी असलेला मदरसा प्रमुख जिया उल्ला खान ला नागपूर येथून अटक करण्यात आली होती.परन्तु त्याला सहकार्य करणारी व पीडित मुलीला आरोपी कडे सुपूर्त करणारी सह आरोपी शिक्षिका ही मागील चार दिवसां पासून फरार होती.तिचे लोकेशन हे मध्यप्रदेश मध्ये दाखवत असल्याने तिचा शोध घेत पोलीस मध्यप्रदेश मध्ये गेले होते.परंतु ती तेथून परत येत पुन्हा त्या अमरावतीच्या मदरश्यात आली असल्याची माहीती पोलिसांना मिळताच तिला अटक करण्यात आली आहे.तसेच पोलिसानी मदरश्यात लागलेल्या सिसिटीव्ही कॅमेऱ्याची हार्डडिक्स ,आरोपीचा मोबाईल, कपडे,व इतर साहित्य मदरश्यातून जप्त केले आहे.दरम्यान या लैंगिक शोषण प्रकरणी अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.