वर्धा नदीत बोट उलटून एकाच कुटुंबातील ११ जण बुडाले; तिघांचे मृतदेह सापडले

author img

By

Published : Sep 14, 2021, 3:06 PM IST

Updated : Sep 14, 2021, 6:40 PM IST

तिघांचे मृतदेह सापडले

वर्धा नदीत बोट उलटून एकाच कुटुंबातील 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे सर्व लोक अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथील होते. दरम्यान, या घटनेतील तीन मृतदेह सापडले असून असून उर्वरित आठ जणांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

अमरावती - वर्धा नदीत बोट उलटून एकाच कुटुंबातील 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे सर्व लोक अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथील होते. दरम्यान, या घटनेतील तीन मृतदेह सापडले असून असून उर्वरित आठ जणांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार एकाच कुटुंबातील अकरा नातेवाईक हे गाडेगाव येथील मते कुटुंबीयांकडे दशक्रिया विधीसाठी आले होते. काल (सोमवार) दशक्रिया कार्यक्रम आटोपल्यानंतर आज (मंगळवार) सकाळी दहा वाजताच्या सुमारास ते सर्व नातेवाईक महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून हे बोटीतून जात होते. मात्र अचानक बोट उलटली आणि अकरा जण बुडाले. यामध्ये बहिण, भाऊ, जावई असा एकमेकांचे नातेवाईक असलेल्या ११ जणांचा समावेश आहे. बोटीतील सर्वजण बुडाले असल्यामुळे अकराही जणांचा मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र शोधकार्य सुरु असून दुपारी एक पर्यंत तिघांचे मृतदेह हाती लागले. यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि एका चिमुकलीचा समावेश आहे. पोलीस व बचाव पथकाच्या मदतीने इतरांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा - मारबत विसर्जनासाठी गेले अन् परत नाही आले, चार युवकांचा नदीत बुडून मृत्यू

नागपूर आणि अमरावती जिल्ह्याच्या संगमवार हे ठिकाणी आहे. झुंज या पर्यटन क्षेत्रावर या महिन्यात हजारो भाविक येत असतात. नदीचे पात्र मोठे असल्याने तिथे बोटींग करण्यात येते. क्षमतेपेक्षा जास्त लोकं या बोटीमध्ये बसल्यामुळे ती उलटली असल्याचा अंदाज आहे. दशक्रिया विधीसाठी जमलेल्या एकाच कुटुंबातील लोक या बोटीतून प्रवास करत होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

राज्यातील आतापर्यंतच्या बोट उलटण्याच्या मोठ्या घटना -

  • 14.03.2020 : रायगड जिल्ह्यातील मांडवा समुद्रकिनारी बोट उलटली होती. त्यामध्ये 78 प्रवासी होते. मात्र सुदैवाने सर्वांना बचावपथकाने सुरक्षित बाहेर काढले. यावेळी मोठी दुर्घटना टळली.
  • 11.08.2019: सांगली जिल्ह्यात बोट उलटल्याने 17 जणांचा मृत्यू झाला.
  • 16.01.2019: नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा नदीपात्रात बोट उलटून सात जणांचा मृत्यू झाला.
  • 24.10.2018: मुंबईतील अरबी समुद्रात प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे 'पूजा' समारंभाच्या दरम्यान सुमारे 25 जणांना घेऊन जाणारी स्पीड बोट खडकावर आदळली. त्यात ती पलटी झाली. यात एकाचा मृत्यू झाला आणि दोन जखमी झाले.
  • 13.01.2018 : पालघरच्या डहाणू आणि पारनाका समुद्रकिनारी 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट पलटी झाली. यात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
Last Updated :Sep 14, 2021, 6:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.