ETV Bharat / state

Impact Of Corona On Industries : एमआयडीसीतील अनेक उद्योग अद्यापही अडचणीत

author img

By

Published : Nov 2, 2022, 4:30 PM IST

Amravati MIDC
अमरावती एमआयडीसी

कोरोना आता जवळपास संपुष्टात (Corona ends) आला असून कोरोनाची भीती नाहीशी झाली आहे. तरीही कोरोना काळात उद्योगांना बसलेल्या फटक्याचे परिणाम (impact of Corona on Industries) मात्र अद्यापही कायम आहे. अमरावतीच्या जुन्या एमआयडीसीत (Amravati MIDC) उद्योगांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा उत्तम असल्या तरी आर्थिक संकटामुळे (financial crisis before entrepreneurs) अनेक उद्योजक अडचणीत आहेत. Latest news from Amravati, Many industries in MIDC are struggling

अमरावती : कोरोना आता जवळपास संपुष्टात (Corona ends) आला असून कोरोनाची भीती नाहीशी झाली आहे. तरीही कोरोना काळात उद्योगांना बसलेल्या फटक्याचे परिणाम (impact of Corona on Industries) मात्र अद्यापही कायम आहे. अमरावतीच्या जुन्या एमआयडीसीत (Amravati MIDC) उद्योगांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा उत्तम असल्या तरी आर्थिक संकटामुळे (financial crisis before entrepreneurs) अनेक उद्योजक अडचणीत आहेत. Latest news from Amravati, Many industries in MIDC are struggling

अमरावती एमआयडीसीतील उद्योजकांची आर्थिक स्थिती डबघाईला


400 पैकी 75 उद्योग बंद - अमरावती एमआयडीसी येथील सर्व चारशे भूखंडांवर कोरोनापूर्वी उद्योग सुरू होते. कोरोनामुळे मात्र अनेक कुशल कामगार हे आपल्या घरी परतले त्यापैकी अनेकजण परतलेच नाही याचा परिणाम उद्योगावर झाला. कोरोना नंतर 400 पैकी 325 उद्योग हे सुरू झाले मात्र त्यापैकी अनेक उद्योग हे आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे कधीही बंद पडू शकतात अशी त्यांची अवस्था आहे इंधन दरवाढ आणि आणि वाढत्या महागाईचा फटका या उद्योगांना बसला असल्याचे अमरावती एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर 'ईटीव्ही भारत 'शी बोलताना म्हणाले.


पुरवठा आणि आर्थिक साखळी विस्कळीत - अमरावती एमआयडीसी पायाभूत सुविधांचा कुठलाही प्रश्न नाही. कोरोनामुळे मात्र गुंतवणूकदार हात राखूनच गुंतवणूक करीत आहेत पूर्वीपेक्षा गुंतवणूकदारांची संख्या कमी झाली आहे. यामुळे सहाजिकच अनेक उद्योगांवर याचा परिणाम झाला. कोरोनामुळे पुरवठा साखळी आणि आर्थिक साखळी विस्कळीत झाली आहे. यामुळे बाजारातून नदी स्वरूपात कच्चामाल खरेदी करावा लागतो आहे आणि विकताना मात्र तो उधारीत द्यावा लागतो. ही उधारी वसूल करणे अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे कच्चा माल देखील पूर्वीसारखा मिळत नाही. ज्या ठिकाणी उपलब्ध आहे तिथे पूर्वीपेक्षा महाग दराने कच्चामाल मिळतो आहे अशी माहिती देखील किरण पातुरकर यांनी दिली.


तिहेरी कराचा बोजा - अमरावती एमआयडीसीतील उद्योजकांवर तिहेरी करांचा बोजा आहे. यामध्ये एमआयडीसीचा सेवा कर विकास कर आणि अमरावती महापालिकेचा कर देखील उद्योजकांना भरावा लागतो. याचा परिणाम म्हणजे अमरावती एमआयडीसी उत्पादित होणाऱ्या वस्तूंचे भाव हे अधिक असल्यामुळे या मालाला हवी तशी मागणी बाजारपेठेत होत नाही. अमरावती महापालिकेकडून एमआयडीसीतील उद्योजकांना कुठलीही सुविधा दिली जात नसतानाही कर आकारला जातो याबाबत सरकारने विचार करायला हवा असे देखील किरण पातुरकर 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.


पायाभूत सुविधा सुधारल्या - जुन्या एमआयडीसी परिसरात रस्ते वीज पाणी या पायाभूत सुविधा सुधारल्या आहेत. एमआयडीसीतील रस्ते सुधारल्यामुळे या भागात वाहतुकीचा प्रश्न सुटला आहे. एमआयडीसी परिसरात पाण्याची मोठी टाकी बांधण्यात आल्यामुळे पूर्वी असणारा पाण्याचा प्रश्न देखील आता निकाली लागला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.