ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट: टरबूज कवडीमोल भावाने विकण्याची शेतकऱ्यावर वेळ

author img

By

Published : May 17, 2020, 7:30 AM IST

Updated : May 18, 2020, 9:31 AM IST

तिवसा तालुक्यातील फत्तेपूर येथील शेतकरी प्रदीप जवंजाळ यांनी यावर्षी पहिल्यांदाच आपल्या दोन एकर शेतामध्ये उसनवार पैसे आणून टरबूज फळाची लागवड केली. मात्र, पीक काढणीला आले त्यावेळी लॉकडाऊन लागल्याने सर्व बाजारपेठ बंद झाली. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

Watermelon
टरबूज

अमरावती - कोरोनाचे संकट दिवसेंदिवस आणखी गडद होत चालले आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी सुद्धा वाढत आहे. या लॉकडाऊनचा प्रचंड फटका शेतकऱ्यांना बसला आहे. दरवर्षी ४० रुपये किलोने विकले जाणारे टरबूज यंदा मात्र भाव व बाजारपेठ नसल्याने केवळ ७ रुपये किलोमध्ये विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

शेतकरी प्रदीप जवंजाळ यांच्या कडून प्रतिनिधी स्वप्नील उमप यांनी माहिती घेतली

तिवसा तालुक्यातील फत्तेपूर येथील शेतकरी प्रदीप जवंजाळ यांनी यावर्षी पहिल्यांदाच आपल्या दोन एकर शेतात उसनवार पैसे आणून टरबूज फळाची लागवड केली. सुरुवातीपासून टरबूज शेतीला खत, फवारणी करून हजारो रुपये त्यावर खर्च केले. मात्र, पीक काढणीला आले त्यावेळी लॉकडाऊन लागल्याने सर्व बाजारपेठ बंद झाली. अशा परिस्थितीत हतबल झालेल्या या शेतकऱ्याने कवडीमोल भावात आपल्या शेतातून टरबूज विक्रीला सुरुवात केली. ७ रुपये किलो टरबूज विकून शेतीत खर्च झालेले पैसे तरी मिळतील, अशी आशा या शेतकऱ्याला आहे.

Last Updated :May 18, 2020, 9:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.