ETV Bharat / state

Dark fog In Chikhaldara: धुक्यात हरवलं चिखलदरा; पर्यटकांना आनंदाची पर्वणी

author img

By

Published : Jul 16, 2023, 8:43 PM IST

Dark fog In Chikhaldara
पर्यटकांना आनंदाची पर्वणी

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील सर्वांत सुंदर पर्यटन स्थळ असणारे चिखलदरा गत तीन दिवसांपासून धुक्यांमध्ये हरवले आहे. रिमझिम बरसणारा पाऊस आणि बोचरी थंडी असे आल्हाददायी वातावरण चिखलदऱ्याचे झाले आहे. या वातावरणाचा आनंद घेण्याची पर्वणी पर्यटकांना लाभली असून शनिवार आणि रविवारची सुट्टी पाहता चिखलदरा पर्यटन स्थळ हे पर्यटकांनी बहरले आहे.

चिखलदऱ्याच्या आल्हाददायी वातावरणाचा आनंद घेताना पर्यटक

अमरावती: मेळघाटातील संपूर्ण सातपुडा पर्वतरांग ही धुक्यांमध्ये हरविली आहे. परत वाड्यावरून चिखलदराकडे जाताना काही उंचीवरच धुक्यांच्या दाट चादरीमुळे अवघ्या दहा मीटर अंतरावरचेही समोर काही दिसत नाही, अशी परिस्थिती आहे. गत तीन दिवसांपासून भर दुपारी बारा वाजता देखील वाहनांचे दिवे लावूनच प्रवास करावा लागतो आहे. जे पर्यटक पहिल्यांदाच अशा वातावरणात चिखलदऱ्याला येत आहेत त्यांच्यासाठी घाटातील प्रवासाचा हा अनुभव अतिशय थरारक असाच आहे.

प्रत्येक पॉईंटवर गर्दी: चिखलदरा येथे असणारे हरिकेन पॉईंट, भीम कुंड, स्कायवाक पॉईंट, गाविलगड किल्ला, देवी पॉईंट अशा सर्वच महत्त्वाच्या पॉईंट्सवर पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. विशेष म्हणजे, रविवारी पहाटे हातभराच्या अंतरावर असणारा माणूस देखील ओळखता येणार नाही इतके प्रचंड धुके चिखलदऱ्यावर पसरले होते. या धुक्यात फिरण्याचा आनंद अनेक पर्यटकांनी लुटला. या धुक्यांमुळे चिखलदरा येथे निर्माण होत असणाऱ्या देशातील सर्वांत मोठ्या स्कायवॉकचे पिल्लर देखील गु्डूप झालेत. आता संपूर्ण पावसाळ्यावर चिखलदराचे वातावरण असेच अतिशय बहरदार राहणार आहे. 15 ऑगस्टला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील चिखलदरा येथे पाय ठेवायला देखील जागा नसणार, अशीच परिस्थिती राहणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीनिमित्त चिखलदरा येथील सर्व हॉटेल, स्टे होम, एमटीडीसीचे रेस्ट हाऊस सारे काही आधीच आरक्षित झाले आहेत.

पक्षी अभ्यासकांसाठी आकर्षण: मेळघाटचे वैभव असलेला रानपिंगळा अनेक पक्षी अभ्यासकांसाठी आकर्षण ठरला. हा पक्षी सर्वेक्षणात अनेक ठिकाणी आढळून आला. तो अनेकांना प्रथमच बघायला मिळाला. मेळघाटात प्रथमच आढळून आलेले पक्षी हे मेळघाटातील पुनर्वसन झालेल्या गावठाण क्षेत्रातील विकसित झालेल्या गवताळ अधिवासात आढळून आले आहेत. मेळघाटमधून २० वर्षांपूर्वी पुनर्वसन झालेल्या कुंड या ठिकाणी पक्षी अभ्यासक मिलिंद सावदेकर व सामिष डोंगळे यांना गुलाबी गोमेट, लांब शेपटीचा गोमेट, काश्मिरी माशीमार हे तीन पक्षी आढळून आले. हिमालयन रूबीथ्रोट या सुंदर पक्ष्याची नोंद रोहित शर्मा यांनी वान अभयारण्यातील बारुखेडा या ठिकाणी घेतली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.