ETV Bharat / state

तुम्ही जन आशीर्वादाचे नाही तर पापाचे भागीदार; भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर आमदार देवेंद्र भुयारांची टीका

author img

By

Published : Aug 17, 2021, 12:51 PM IST

केंद्र सरकारच्या योजना, केंद्र सरकारने केलेली कामे हे जनतेपर्यंत पोहवण्यासाठी भाजपाकडून राज्यभर जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. या जन आशीर्वाद यात्रेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी टीका केली आहे. भाजपा जन आशीर्वादाचे नाही तर पापाचे भागीदार आहे, असे आमदार भुयार म्हणाले.

Criticism of MLA Devendra Bhuyar on BJP's Jan Ashirwad Yatra
भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर आमदार देवेंद्र भुयारांची टीका

अमरावती - कोरोना काळात केंद्र सरकारने किती दिवे लावले, किती ताट वाजवले हे संपूर्ण देशाला व जगाला माहीत आहे. केंद्र सरकारची अब्रु संपूर्ण जगाने बाहेर काढली आहे. त्यामुळेच आता राज्यांतील चार नवीन मंत्र्यांना इंजेक्शन देऊन त्यांना फुगवून यांनी जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे, अशी जहरी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर केली आहे. हे जन आशीर्वादाचे धनी नाही तर हे खरे पापाचे धनी आहेत, अशी टीकाही आमदार भुयार यांनी केली आहे.

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर आमदार देवेंद्र भुयारांची टीका

भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेवर विरोधकांची टीका -

केंद्र सरकारच्या योजना, केंद्र सरकारने केलेले कामे हे जनतेपर्यंत पोहवण्यासाठी भाजपाकडून राज्यभर जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, नारायण राणे, डॉ. भारती पवार आणि डॉ. कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणाहून या यात्रेला सुरुवात झाली आहे. भाजपचे चार नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री हे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. दरम्यान, या यात्रेवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.

जन आशीर्वादासाठी चांगले काम करणे गरजेचे -

तुम्हाला जो काही जन आशीर्वाद मिळवायचा होता त्यासाठी कोरोना काळात चांगले काम करणे गरजेचे होते. परंतु, केंद्र सरकारने कोरोना काळात चांगले काम केले नाही. त्यामुळे अनेक गोरगरीब कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. त्याचे पाप हे आता केंद्र सरकारला लागणार आहे. त्यामुळे भाजपची जन आशीर्वाद यात्रा होऊ शकत नाही असेही आमदार देवेंद्र भुयार म्हणाले.

हेही वाचा - आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांच्या कारावासासह न्यायालयाने ठोठावला 45 हजारांचा दंड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.