ETV Bharat / state

अमरावती : ऑक्सीजन पार्कजवळ धावती कार पेटली

author img

By

Published : Sep 27, 2019, 9:24 PM IST

कारने पेट घेतल्याचे लक्षात येतात कारचालक राहुल हुमणे यांनी कारच्या बाहेर उडी घेतली. चालकाव्यतिरिक्त इतर कोणीही कारमध्ये नव्हते.

अमरावती : ऑक्सीजन पार्कजवळ धावती कार पेटली

अमरावती - शहरात जुन्या महामार्गावर ऑक्सीजन पार्कलगत धावती कार अचानक पेटल्याने खळबळ उडाली आहे. कारने पेट घेताच चालकाने कारच्या बाहेर उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

अमरावती : ऑक्सीजन पार्कजवळ धावती कार पेटली

हे ही वाचा - मुंबई-नाशिक महामार्गावर 'द बर्निंग कार', पाच लाखांची रोकड जळून खाक

शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चपराशीपुराकडून यशोदानगरकडे येणाऱ्या कारला ऑक्सीजन पार्क लागत अचानक आग लागली. कारने पेट घेतल्याचे लक्षात येतात कारचालक राहुल हुमणे यांनी कारच्या बाहेर उडी घेतली. चालकाव्यतिरिक्त इतर कोणीही कारमध्ये नव्हते. ऑक्सीजन पार्कलगत कार पेटल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. काही वेळातच कारला लागलेली आग विझवण्यात आली. या दरम्यान फ्रेझरपुरा पोलिसही घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी जुन्या महामार्गावरील एका बाजूची वाहतूक काही अंतरापर्यंत बंद करण्यात आली होती या आगीत कार पूर्णतः जळून खाक झाली आहे.

हे ही वाचा - डोंबिवलीत बर्निंग कारचा थरार; आगीत जळून खाक

Intro:अमरावती शहरात जुन्या महामार्गावर ऑक्सीजन पार्कलगत धावती कार अचानक पेटल्याने खळबळ उडाली. कारने पेट घेताच चालकाने कारच्या बाहेर उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला.


Body:शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास चपराशीपुरा कडून यशोदानगर कडे जाणाऱ्या कारला ऑक्सीजन पार्क लागत अचानक आग लागली. कारने पेट घेतल्याचे लक्षात येतात कारचालक राहुल हुमणे यांनी कारच्या बाहेर उडी घेतली. चालकाव्यतिरिक्त इतर कोणीही कारमध्ये नव्हते. ऑक्सीजन पार्क लागत कार पेटल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली आणि काही वेळातच कारला लागलेली आग विझवण्यात आली. फ्रेझरपुरा पोलिसही घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी जुन्या महामार्गावरील एका बाजूची वाहतूक काही अंतरापर्यंत बंद करण्यात आली होती या आगीत कार पूर्णतः जळाली.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.