ETV Bharat / state

Amravati Crime News : अमरावतीत बोगस बियाणांची विक्री करणाऱ्याला रंगेहात पकडले

author img

By

Published : Jun 18, 2023, 7:22 PM IST

bogus Cotton seed seller caugh
बोगस बियाणांच्या विक्रेत्याला पकडले

अमरावतीमध्ये बोगस बियाणांची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आले आहे. कृषी विभाग आणि पोलिसांनी मिळून ही कारवाई केली.

अमरावती : अमरावतीमध्ये कापसाच्या एचटीबीटी बोगस बियाणांची विक्री करणाऱ्या एका इसमावर कृषी विभाग आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. अशोक भाटे (वय 37 वर्षे) असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बोगस बियाणे विक्रीच्या संदर्भात कृषी विभाग व पोलीस विभागाच्या गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

कृषी विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई : एक एजंट अमरावती शहरा नजिकच्या गावांमध्ये जाऊन शासन मान्य नसलेले बोगस बियाणे विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखा आणि कृषी विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे ट्रॅप लावून बोगस बियाणे विक्री करणाऱ्या इसमाला रंगेहात पकडण्यात आले. पोलिसांना त्या इसमाकडे एकूण 422 पाकीट बोगस बियाणे आढळून आली. त्याच्याकडून 4 लाख रुपयांच्या बियाण्यांसह 9 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सापळा रचून अटक केली : अशोक भाटे हा एजंट असून तो कापसाच्या बोगस एचटीबीटी बियाणांंची गावांगावात विक्री करत आहे. सायंकाळी तो बियाणे विक्री करण्यासाठी अमरावती येथील सुरुची इन बार पोटे पाटील रोडवर येत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्या आधारे कृषी विभागाने गुन्हे शाखेच्या मदतीने सापळा रचून आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले.

वर्ध्यातही असेच प्रकरण आले होते उजेडात : वर्धा जिल्ह्यातही अशाच प्रकरचे एक प्रकरण उघडकीस आले होते. येथील म्हसाळा इथे पोलीस आणि कृषी विभागाने कोट्यावधी रुपयांच्या बोगस बियाणे निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला होता. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी या बनावट बियाणे विक्री करणाऱ्या रॅकेटचा छडा लावला होता. या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी 15 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन 10 आरोपींना अटक केली होती.

हे ही वाचा :

  1. Nanded Crime News: पेरणीच्या तोंडावर बोगस सोयाबीन बियाण्यासह 99 लाखांचा मुद्देमाल जप्त; बनावट कंपनी विरोधात गुन्हा नोंद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.