ETV Bharat / state

Bhau Beej Festival 2023 : भाऊबीजनिमित्त खासदार नवनीत राणांचं सुरक्षा रक्षकांना औक्षण

Bhau Beej Festival 2023 : चोवीस तास सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या सुरक्षारक्षकांसोबत अमरावतीच्या भाजपा खासदार नवनीत राणा यांंनी औक्षण करून भाऊबीज सण साजरा केलाय.

Bhau Beej Festival 2023
Bhau Beej Festival 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 5:07 PM IST

खासदार नवनीत राणा यांची प्रतिक्रिया

अमरावती Bhau Beej Festival 2023 : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज भाऊबीजेच्या पर्वावर त्यांच्या सुरक्षा रक्षकांना औक्षण केलंय. चोवीस तास सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या सुरक्षारक्षक, अधिकारी, तसंच पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना औक्षण करून राणा यांनी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राणांच्या निवासस्थानी खास भाऊबीज सोहळा : खासदार नवनीत राणा यांना वाय प्लस सुरक्षा आहे. यांच्या शंकरनगर येथील निवासस्थानी पोलीस कर्मचारी देखील तैनात आहेत. सुरक्षेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खासदार नवनीत राणा यांनी खास भाऊबीज सोहळा आयोजित केला. यावेळी नवनीत राणा यांनी सर्व सुरक्षारक्षकांना भाऊबीजेच्या मुहूर्तावर औक्षण करून त्यांना ओवाळलं. सुरक्षेसाठी कर्तव्यावर असणारे सुरक्षा रक्षक दिवाळीत तैनात असतात. त्यामुळं कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना खासदार नवनीत राणा यांच्या वतीनं सुरक्षा रक्षकांना औक्षण करण्यात आलं. यावेळी सुरक्षा जवानांनी बहीण म्हणून खासदार नवनीत राणा यांना ओवाळणी देखील दिली.

खासदार राणा म्हणाल्या, हा आनंदाचा क्षण : यावेळी भाजपा खासदार नवीनत राणा म्हणाल्या की, जगभरात दिवाळी मोठ्या उत्सहानं साजरी करण्यात येते. त्यातचं माझ्या सुरक्षेसाठी राज्यातील विविध भागातील पोलीस, कर्मचारी, अधिकारी, सुरक्षा सक्षक तैनात असतात. त्यांनी त्यांच्या कुटुंबासोबत दिवाळीचा सण साजरा करता येत नाही. त्यामुळं त्यांना कुटुंबाची कमी जाणवू नये, म्हणून मी त्यांना औक्षण करत आहे. माझ्या सुरक्षेसाठी असणारे सर्व सुरक्षारक्षक हे माझ्यासाठी माझ्या भावासारखेच आहेत. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आपल्या कुटुंबापासून दूर असल्यामुळं मी सर्वांसोबत दिवाळी सण उत्सवात साजरा करते.

का करतात भाऊबीज : देशात दिवाळीचा सण धुमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. आनंद, उत्साह, चैतन्य वाढवणारी दिवाळी देशात उत्सहानं साजरी होते. दिवाळीत भाऊबीज बहीण भावाचं अतुट नातं दर्शवण्यासाठी साजरी केली जाते. यावेळी बहीण भावाला दीर्घायुष्यासाठी औक्षण करते. भाऊबीजेचा सण यम द्वितीय म्हणून देखील ओळखला जातो. आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळावं यासाठी बहीण यमराजाची पूजा करते. तसंच भावाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना देखील करतात.

हेही वाचा -

  1. CM in Amravati : अमरावतीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सिने कलावंतांच्या उपस्थित फुटणार दहीहंडी
  2. Hanuman chalisa Pathan In Amravati: राणा दाम्पत्याच्या हनुमान चालीसा पठणला पोलिसांनी नाकारली परवानगी, 'हे' दिले कारण
  3. Hanuman Chalisa Row: उशीरा पोहोचल्याने नवनीत राणांना न्यायालयाने फटकारले, पुढील सुनावणी 19 जूनला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.