ETV Bharat / state

Akola Riots : अकोल्यात दोन समाजाच्या गटामध्ये झालेली दंगल ही पूर्वनियोजित, गिरीष महाजनांना संशय

author img

By

Published : May 15, 2023, 9:13 PM IST

दंगलग्रस्त भागाला राज्याचे वैद्यकीय शिक्षण,ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी भेट दिली. दंगलग्रस्त भागाची मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. यावेळी महाजन यांनी अकोल्यातील राजराजेश्वर मंदिर आणि हरिहर पेठजवळील हिंसाचारग्रस्त भागांचीही त्यांनी पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी दंगलीत मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला भेट दिली आणि त्यांचे सांत्वन केले.

Girish Mahajan
गिरीष महाजन

अकोला : शहरातील दोन समाजाच्या गटामध्ये झालेली दगडफेक वाद हा पूर्वनियोजित होता, असा संशय मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. शनिवारी रात्री अकोला शहातील दोन समाजातील गटात दगडफेक झाली होती. यात एकाचा जीव गेला असून 9 जण जखमी झाले आहेत.

गिरीष महाजन यांची भेट : या दंगलग्रस्त भागाला राज्याचे वैद्यकीय शिक्षण,ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी भेट दिली. दंगलग्रस्त भागाची मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. यावेळी महाजन यांनी अकोल्यातील राजराजेश्वर मंदिर आणि हरिहर पेठजवळील हिंसाचारग्रस्त भागांचीही त्यांनी पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी दंगलीत मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला भेट दिली आणि त्यांचे सांत्वन केले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचेही त्यांनी सांगितले. गरीब आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या मृताच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदत करण्याचे आश्वासनही महाजन यांनी दिले आहे.

दंगल पूर्वनियोजित : दरम्यान ही घटना पूर्वनियोजित होती, यामध्ये मोठ्या प्रमाणात घरांचे व गाड्यांचे नुकसान झाले आहे. यामधील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. या दंगली प्रकरणी पोलिसांनी 26 जणांना ताब्यात घेतले असून दंगलग्रस्त भागात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या दंगलीत मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव विलास गायकवाड (वय वर्ष 40) असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झाले धार्मिक मेसेज : सोशल मीडियावर धार्मिक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर शहरात शनिवारी रात्री हाणामारी झाली, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दोन समजातील दोन गटाने एकमेंकावर दगडफेक केली, यात टू व्हीलर व फोर व्हीलर गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. दंगलकर्त्यांनी काही दुचाकी आणि चारचाकी वाहने जाळली होती. या दंगलीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह आठ जण जखमी झाले आहेत, तर एकाचा जीव गेला असल्याचे या अधिकाऱयाने सांगितले.

संचारबंदी लागू : या दंगलीचे पडसाद कुठे उमटू नये, तसेच शहरात कुठे अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सोशल मीडियावर कुठल्याच प्रकारची अफवा पसरता कामा नये यासाठी पोलिसांनी या शहरातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातील चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदेशीरपणे एकत्र येण्यास मनाई करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी नीमा अरोरा यांनी दिले आहेत.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.