शहरातील प्रत्येक रिक्षावर मिळतील पोलीस हेल्पलाईन क्रमांक; शहर वाहतूक शाखेची मोहीम

author img

By

Published : Sep 25, 2021, 4:39 AM IST

f

महिला प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी, प्रवासी रिक्षावर पोलीस हेल्पलाईन क्रमांक आणि रिक्षामध्ये चालकाचा फोटो किंवा मालकाचा फोटो यासोबतच मोबाईलनंबर लिहणे शहर वाहतूक शाखेने अनिवार्य केले आहे. यामुळे महिलांबाबतीत होणाऱ्या अनुचित घटना व प्रवाशांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी शहर वाहतूक शाखेने शक्कल लढविली आहे. ज्या चालकांकडे पोलीस हेल्पलाईन नंबर नसतील त्यांना पोलिसांकडूनच नंबर देण्यात येणार आहे.

अकोला - महिला प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी, प्रवासी रिक्षावर पोलीस हेल्पलाईन क्रमांक आणि रिक्षामध्ये चालकाचा फोटो किंवा मालकाचा फोटो यासोबतच मोबाईलनंबर लिहणे शहर वाहतूक शाखेने अनिवार्य केले आहे. यामुळे महिलांबाबतीत होणाऱ्या अनुचित घटना व प्रवाशांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी शहर वाहतूक शाखेने शक्कल लढविली आहे. ज्या चालकांकडे पोलीस हेल्पलाईन नंबर नसतील त्यांना पोलिसांकडूनच नंबर देण्यात येणार आहे.

माहिती देताना पोलीस निरीक्षक पाटील

देशात महिला, अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अनुचित घटनांना रोखण्यासाठी पोलिसांकडून नानाविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याच उपक्रमाला चांगली आणि महत्त्वाची जोड देण्यासाठी शहर वाहतूक शाखेने एक नवे पाऊल टाकले आहे. या उपक्रमातून संशयितांना पकडण्यास पोलिसांना नक्कीच मदत होईल, असा आशावाद पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

रिक्षा, खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलीस हेल्पलाईन, दामिनी पथक हेल्पलाईन, पोलीस नियंत्रण कक्षाचे नंबर असलेले स्टिकर तयार करून लावणे बंधनकारक असल्याचे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी सांगितले. तसेच रिक्षा व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनात वाहन मालक किंवा चालकाचे छायाचित्र व भ्रमणध्वनी क्रमांक प्रवाशांना दिसेल, अशा प्रकारे लावणे बंधनकारक असल्याचेही पाटील म्हणाले.

पोलिसांचा प्रयोग ठरणार फायदेशीर - पोलीस अधीक्षक

या उपक्रमामुळे प्रवाशांना वाहनाची नोंद ठेवता येईल. तसेच काही अनुचित प्रकार घटल्यास ओळख पटिण्यास सोपे जाईल. हा उपक्रम एका नव्या क्रांतीला निर्माण करणारा ठरू शकतो, असा आशावाद पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी व्यक्त केला आहे.

अशी राहणार स्टिकर्सवर माहिती

शहर वाहतूक शाखेतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्टिकर्सवर वाहन चालकाचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर तसेच वाहन क्रमांक लिहिलेले असून अकोला पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक-100, पोलीस मदत क्रमांक-112, पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 0724-2435500 या क्रमांकाची नोंद करण्यात आली आहे.

जर एखाद्या महिला किंवा युवतीला रिक्षातून प्रवास करताना कोणताही त्रास झाला तर त्यांनी रिक्षात दिलेल्या क्रमांकावर त्वरित फोन केल्यास त्यांना पोलीस विभागाकडून त्वरित मदत मिळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा - सहायक अभियंत्याची दारू पिऊन वीजबिल वसुली, पाथर्डी ग्रामस्थांनी व्हिडिओ केला व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.