ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra : अकोल्यातील काँग्रेसच्या वॉररूममधून होतेय 'भारत जोडो' यात्रेचे नियोजन

author img

By

Published : Nov 8, 2022, 5:42 PM IST

Updated : Nov 8, 2022, 6:33 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे ( Bharat jodo yatra ) 7 नोव्हेंबर रोजी राज्यात आगमन झाले. भारत जोडो यात्रा अकोला जिल्ह्यात ( Bharat jodo yatra in Akola district ) 17 नोव्हेंबर रोजी दाखल होत आहे. जवळपास दीड दिवस असणाऱ्या या यात्रेचे नियोजन काँग्रेसकडून जोरात सुरू आहे. यासाठी काँग्रेसतर्फे स्वराज्य भवन येथे एक वॉर रूम स्थापन करण्यात आलेले आहे. या वाॉररूम मधून जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. आणि वाॉररूम मधून सर्व माहिती देण्यात येणार आहे.

अकोला : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे ( Bharat jodo yatra ) 7 नोव्हेंबर रोजी राज्यात आगमन झाले. भारत जोडो यात्रा अकोला जिल्ह्यात ( Bharat jodo yatra in Akola district ) 17 नोव्हेंबर रोजी दाखल होत आहे. जवळपास दीड दिवस असणाऱ्या या यात्रेचे नियोजन काँग्रेसकडून जोरात सुरू आहे. यासाठी काँग्रेसतर्फे स्वराज्य भवन येथे एक वॉर रूम स्थापन करण्यात आलेले आहे. या वाॉररूम मधून जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. आणि वाॉररूम मधून सर्व माहिती देण्यात येणार आहे.

कॉंग्रेस नेते प्रकाश तायडे माहिती देताना

यात्रा दिवशी जिल्ह्यात दाखल - राहुल गांधी देशात भारत जोडो यात्रा यांची सुरू आहे. या यात्रेच्या टप्प्यातील भाग हा आता महाराष्ट्रात दाखल झालेला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते या यात्रेसाठी परिश्रम घेत आहे. नांदेड येथून निघालेली यात्रा 17 नोव्हेंबर आणि 18 नोव्हेंबर असे पातुर आणि बाळापूर येथे दाखल होत आहे. या यात्रेमध्ये लाखो नागरिक सहभागी होत आहे. त्यानुसार यात्रेचे नियोजन करण्यासाठी काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी आपापल्या स्तरावर एक संघटित होऊन नियोजन करीत आहेत. या यात्रेच्या नियोजनासाठी स्वराज्य भवन येथे वार रूम तयार करण्यात आलेली आहे. या वॉर रूमच्या माध्यमातून प्रत्येक आर्थिक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविल्या जात आहे. तसेच सर्व नेतेही या वॉर रूमच्या पदाधिकारी यांच्यासोबत संपर्कात आहेत.


यात्रेचे असे असेल नियोजन - जिल्ह्यातील मेडशीची रॅली सपल्यानंतर रात्री 8.30 वाजेपर्यंत पातूरला साई जिनिगला मुक्काम, 17 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता झेंडावंदन झाल्यावर शहाबाबू चौक किंवा पातूर पोलिस ठाने चौक, संभाजी चौक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे अभिवादन करीत रेणुका मातेच्या पायथ्याशी मल्लखांबचे प्रात्यक्षिक पाहणी नंतर देऊळगाव, बाभूळगाव चौक स्वागत, पुढे दिग्रस फाटा, हिंगणा उजाडे गाव, चांनी फाटा, बुलढाणा अरबन गोदामात सकाळी 10.30 पर्यत पोहोचतील. जेवण 11 ते 3.30 होईल. आणि यानंतर निवेदन स्वीकारतील. मग धनेगावला समारोप, बाग फाटा येथे मुक्काम सायंकाळी 7.30 वाजता होणार आहे. जिल्ह्यातील यात्रेच्या दुसऱ्या दिवशी 18 नोव्हेंबर रोजी बाग फाटा येथे सकाळी 6 वाजता झेंडावंदन सुरुवात, अकोला नाका, धनाबाई विद्यालय समोरून बाळापूर येथे प्रवेश बाळापूर बसस्थानक चौकातून खामगाव मार्गावरील पुलावरून खामगाव मार्गे नवीन शेगाव रस्ता, सकाळी 10.30 वरखेड येथे मुक्काम व जेवण यानंतर बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश झाल्यानंतर शेगाव येथे सभा होणार आहे.

Last Updated :Nov 8, 2022, 6:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.