ETV Bharat / state

Agricultural Services Main Exam :  कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारची पाठ; विद्यार्थ्यांचे 22 दिवसांपासून आंदोलन

author img

By

Published : Feb 15, 2023, 6:33 PM IST

Updated : Feb 15, 2023, 7:21 PM IST

22 दिवसांपासून सुरू आहे कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदोलन विविध मागण्यासाठी सुरु आहे.या आंदोलनाची कोणीही दखल घेतली नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. कृषी सेवा मुख्य परीक्षा 2021, 22 ला स्थगिती द्यांवी, अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे करावे यासह इतर मागण्यांसाठी कृषी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

Agricultural Services Main Exam
Agricultural Services Main Exam

कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू

अकोला : कृषी सेवा मुख्य परीक्षा 2021 व 22 ला तत्काळ स्थगिती देऊन अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे करावे यासह इतर मागण्यांसाठी कृषी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या 22 व्या दिवशी विद्यार्थ्यांनी ही आंदोलन सुरूच आहे. शासनाने व विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

तत्काळ भरती प्रक्रिया : महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये चारही विद्यापीठातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2021 आणि घेण्यात येणारी महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 ला तत्काळ स्थगिती अशी मागणी विद्यार्थांनी केली आहे. तसेच कृषी अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषय पूर्ववत करण्यात यावा, स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय महाराष्ट्र राज्यासाठी स्थापन करावे, मृद, जलसंधारण विभागात कृषी अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांना पात्र करून कृषी अभियंतांची तत्काळ भरती प्रक्रिया राबविण्यात यावी अशा विद्यार्थांच्या मागण्या आहेत.

गेल्या 22 दिवसांपासून आंदोलन : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेला कृषी अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषय इतर शाखेप्रमाणेच समाविष्ट करण्यात यावा, या इतर मागण्यांसाठी या विद्यार्थ्यांची गेल्या 22 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाकडे अद्याप पर्यंत राज्य शासन त्यासोबतच कृषी विद्यापीठाकडूनही लक्ष दिले गेले नाही. परिणामी, या विद्यार्थ्यांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जोपर्यंत प्रशासन आमच्या मागण्या मान्य करत नाहीत, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवू असे विद्यार्थ्यांनी यावेळी जाहीर केले आहे. या आंदोलनामध्ये दीपक पाटील, किशोर आरगडे, विशाल लाटेवार, अनिकेत राऊत, दुष्यंत रहंगडाळे यांच्यासह शेकडो विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

महाविद्यालय केले बंद : विद्यापीठ प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी तसेच मागण्यांवर केलेल्या कारवाईची माहिती व त्यावर काय कारवाई करण्यात आली. या संदर्भात जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. आंदोलनाची दखल घेत कुलगुरू, सचिव, डीन आदींनी घटनास्थळ गाठून विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या मागण्या राज्यपालांपर्यंत पोहोचवण्याची आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या मागण्या संदर्भात त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी याप्रसंगी केली.

माजी विद्यार्थी संघटना यांचा पाठिंबा : 22 दिवसांपासून सुरू असलेल्या कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता महाराष्ट्र कृषी अभियांत्रिकी माजी विद्यार्थी संघटना यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या या रास्त असून त्यांना न्याय द्यावा, अशी भूमिका माजी विद्यार्थ्यांनी घेतली आहे. त्यामुळे या आंदोलनामध्ये माजी विद्यार्थ्यांची संघटना ही आता सहभागी होणार असल्याचा इशारा संघटनेचे पदाधिकारी संतोष गोरे यांनी दिला आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्या तात्काळ मागण्या कराव्यात, अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली आहे.


हेही वाचा - Pooja Salve Burning Case : गजानन मुंडे, पूजा साळवे यांच्या जळीत प्रकरणाचा अहवाल कुलगुरूकडे; त्रास दिल्याचे झाले स्पष्ट

Last Updated :Feb 15, 2023, 7:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.