ETV Bharat / state

Hindu Parishad Joined Shinde Group: शिवसंग्रामचे नेते आणि विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकाऱ्यांनी घेतला शिंदे गटात प्रवेश

author img

By

Published : Dec 14, 2022, 4:02 PM IST

Hindu Parishad Joined Shinde Group: शिंदे गटाच्या बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटामध्ये पक्ष प्रवेशासाठी राजकीय पदाधिकाऱ्यांचा ओघ वाढत आहे. अकोल्यात ही इतर राजकीय पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी पक्ष प्रवेश करत आहेत. त्याच माध्यमातून स्व. विनायकराव मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षातील प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

Hindu Parishad Joined Shinde Group
Hindu Parishad Joined Shinde Group

अकोला: स्व. विनायक मेटे यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे नेते गोपाल नागापुरे यांनी ही त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत प्रवेश केला आहे. शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा संघटक माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला आहे.

विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकाऱ्यांनी घेतला शिंदे गटात प्रवेश

शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश: शिंदे गटाच्या बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटामध्ये पक्ष प्रवेशासाठी राजकीय पदाधिकाऱ्यांचा ओघ वाढत आहे. अकोल्यात ही इतर राजकीय पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी पक्ष प्रवेश करत आहेत. त्याच माध्यमातून स्व. विनायकराव मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षातील प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे गोपाल नागापुरे यांनीही त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत पक्षात प्रवेश घेतला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या विचारांना घेऊन पक्षात प्रवेश: शिंदे गटाकडून पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यांना नेमकी कोणती जबाबदारी द्यायची आहे. हे अद्याप निश्चित झाले नसले, तरी त्यांना समिती निर्णय घेऊन योग्य ते पद देईल, असे माजी आमदार व शिंदे गटाचे जिल्हा संघटक गोपीकिशन बाजीराव यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष विठ्ठल सरप अश्विन नवले, शहराध्यक्ष योगेश अग्रवाल यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्या विचारांना घेऊन पक्षात प्रवेश केला आहे. पक्ष संघटन करून पक्ष मजबूत करणार असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.