ETV Bharat / state

बिबट्याला पाहून सायकल सोडून पळाले विद्यार्थी, अन्...

author img

By

Published : Sep 22, 2019, 12:35 PM IST

वन विभागाने लावलेला पिंजरा

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा बिबट्या शेतात दिसला होता. त्यामुळे वन विभागाच्या चमूने संपूर्ण जंगल भागाजवळील शेतांची पाहणी केले. परंतु, त्या ठिकाणी त्यांना बिबट्या दिसून आला नाही. परिणामी, वन विभागाने ज्या ठिकाणी बिबट्या दिसला, त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले.

अकोला- बार्शीटाकळी तालुक्यातील कानशिवणी छबिले-टाकळी येथील गावाजवळील जंगलाच्या शेजारी असलेल्या शेतात रस्त्याच्या कडेला बिबट्या आढळला होता. दोन दिवसाआधी शाळकरी मुलांना रस्त्याच्या कडेला हा बिबट्या दिसला होता. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी तत्काळ बार्शीटाकळी वन विभागाला दिली. वन विभागाने पिंजरा आणि ट्रॅप कॅमेरा लावून बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

याप्रकरणी माहिती देताना विद्यार्थी

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा बिबट्या शेतात दिसला होता. त्यामुळे वन विभागाच्या चमूने संपूर्ण जंगल भागाजवळील शेतांची पाहणी केले. परंतु, त्या ठिकाणी त्यांना बिबट्या दिसून आला नाही. परिणामी, वन विभागाने ज्या ठिकाणी बिबट्या दिसला त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले. त्या कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला आहे. या भागात सर्वत्र जंगलाचा भाग असल्याने अनेक वन्य प्राणी या जंगलात आहे. सध्या स्थितीत हा बिबट्या जंगलाच्या भागात आहे.

हेही वाचा- अकोल्यात दमदार पावसाची हजेरी

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वन विभागाकडून पिंजरा ठेवण्यात आला आहे. परंतु, हा पिंजरा शोभेची वस्तू झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे. माहिती देऊनही वन विभागाने येथे गस्त घालण्यास सुरुवात केली नाही. परिणामी ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला आहे. तर बार्शीटाकळी आरएफओ लाड यांनी बिबट्या दिसल्याचा दुजोरा दिला. मात्र, याबाबत ईतर माहिती देण्यास त्यांनी टाळले. त्यामुळे बिबट्याच्या दिसण्याबाबत आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेबाबत वन विभागाचे आरएफओ लाड हे किती गंभीर आहे, यावरून दिसून येत आहे.

Intro:अकोला - बार्शीटाकळी तालुक्यात येत असलेल्या कानशिवणी छबिले - टाकळी येथील गावा जवळील जंगलाच्या शेजारी असलेल्या शेतात दोन दिवसाआधी शाळकरी मुलांना रस्त्याच्या कडेला बिबट दिसल्याने त्यांनी एकच धूम ठोकली. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी तात्काळ बार्शीटाकळी वन विभागाला दिली. वन विभागाने पिंजरा आणि ट्रॅप कॅमेरा लावून बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. Body:गावकर्यांच्या म्हणन्या नुसार हा बिबट शेतात दिसला. त्यामुळे वन विभागची चमूने संपूर्ण जंगल भागा जवळील शेतांची पाहणी केले. परंतु, त्या ठिकाणी त्यांना बिबट दिसून आला नाही. परिणामी, वन विभागाने ज्या ठिकाणी बिबट दिसला त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले. त्या कॅमेऱ्यात बिबट कैद झाला आहे. परंतु, या भागात सर्वत्र जंगलाचा भाग असल्याने अनेक वन्य प्राणी या जंगलात आहे. सध्या स्थितीत हा बिबट जंगलाच्या भागात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात पिंजरा ठेवण्यात आला आहे. परंतु, पिंजरा हा शोभेची वस्तू असल्याचे ग्रामस्थ म्हणत आहे. माहिती देऊनही वन विभागाने येथे गस्त ही घालण्यास सुरुवात केली नाही. परिणामी ग्रामस्थानमध्ये रोष निर्माण झाला आहे. तर बार्शीटाकळी आरएफओ लाड यांनी बिबट दिसल्याचा दुजोरा दिला. मात्र, काहीही बोलण्यास त्यांनी टाळले. त्यामुळे बिबटच्या दिसण्याबाबत आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेबाबत वन विभागाचे आरएफओ लाड हे किती गंभीर आहे, यावरून दिसून येत आहे.

बाईट - शुभम छबिले
बाईट - रोहन छबिलेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.