ETV Bharat / state

अकोल्यातील 5 पशु वैद्यकीय केंद्रांना आयएसओ मानांकन; जिल्हा परिषदेचा उपक्रम

author img

By

Published : Aug 17, 2019, 5:33 PM IST

अकोला पंचायत समितीमधील पाच पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ (आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना) मानांकन देण्यात आले आहे. या दवाखान्यांमध्ये आयएसओच्या नियमानुसार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या पाच पशु वैद्यकीय केंद्रांना आयएसओ मानांकन; अकोला जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग

अकोला - जिल्हा परिषदे अंतर्गत असलेल्या अकोला पंचायत समितीमधील पाच पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ (आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना) मानांकन देण्यात आले आहे. जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 28 पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ करण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या पाच पशु वैद्यकीय केंद्रांना आयएसओ मानांकन; अकोला जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग
अकोला जिल्हा परिषदेच्या अंतर्गत 68 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. या दवाखान्यांमध्ये अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपचार मिळावेत, यासाठी अधिकारी प्रयत्न करत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे पशुवैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. आर. मिश्रा यांनी पहिल्या टप्प्यात 28 पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ करण्याचा निर्धार केला आहे. त्यापैकी अकोला पंचायत समितीमधील पाच दवाखान्यांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. राहिलेले 40 दवाखाने लवकरच हे मानांकन प्राप्त करतील, अशी माहिती डॉ. एच. आर. मिश्रा यांनी दिली.
अकोला पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या घुसर, बोरगाव मंजू, भौरद, निंभोरा, कापशी येथील पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ मानांकन प्राप्त आहेत. या दवाखान्यांमध्ये आयएसओच्या नियमानुसार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
Intro:अकोला - जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या अकोला पंचायत समितीमधील पाच पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील 28 पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.
Body:जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्ह्यात 68 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. या दवाखान्यांमध्ये अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपचार मिळण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे पशु वैद्यकीय अधीक्षक अधीक्षक वैद्यकीय अधीक्षक अधीक्षक पशु वैद्यकीय अधीक्षक अधीक्षक वैद्यकीय अधीक्षक अधीक्षक डॉ. एच. आर. मिश्रा यांनी पहिल्या टप्प्यात 28 पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ मानांकन करण्याचा निर्धार केला आहे. त्यापैकी अकोला पंचायत समितीमधील पाच दवाखाने आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहेत. इतर दवाखाने लवकरच हे मानांकन प्राप्त होतील. उर्वरित 40 दवाखाने 2021 ते 2023 दरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती माहिती डॉ. एच. आर. मिश्रा यांनी दिली. अकोला पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या घुसर, बोरगाव मंजू, भौरद, निंभोरा, कापशी येथील पशुवैद्यकीय दवाखाने हे आयएसओ मानांकन प्राप्त करण्यात आली आहेत. या दवाखान्यांमध्ये आयएसओच्या नियमानुसार तिथे सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

बाईट - आयुष प्रसाद
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोलाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.