ETV Bharat / state

शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढल्याने आमदार मिटकरींसह 300 जणांवर गुन्हा दाखल

author img

By

Published : Feb 20, 2021, 2:23 AM IST

case registered against people including mla mitkari for holding a procession on the occasion of ShivJayanti
शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढल्याने आमदार मिटकरींसह 300 जणांवर गुन्हा दाखल

राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन सत्तेत सहभागी पक्षातील आमदारांकडून होत असून शिवजयंतीनिमित्त मिरवणुक काढणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला - शिवजयंतीनिमित्त कुटासा गावात काढण्यात मिरवणुक काढल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी तसेच सहभागी 300 जणांवर गुन्ह दाखल करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन सत्तेत सहभागी पक्षातील आमदारांकडून होत असल्यामुळे इतरांनी नियम का पाळावे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सत्ताधारी पक्षातील आमदारच तोडत आहे नियम -

जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राज्य सरकारने या संदर्भात खबरदारी घेण्याचे आवाहन जनतेला केले आहे. तसेच अकोला, अमरावती, नागपूर यासह इतर जिल्ह्यांत कोरोना रुग्णांचा उद्रेक होत असल्याने या जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळेच राज्य सरकारने 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये 100 पेक्षा जास्त नागरिकांनी सहभागी होऊ नये, असे आदेश काढले होते. असे असतानाही सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांनीच कोरोना प्रतिबंधक नियम तोडण्यात आघाडी घेतली आहे.

नागरिकांनी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई का -

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कुटासा गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये मिरवणूक काढली. तसेच राज्य सरकारच्या नियमांचे उल्लंघन मिटकरी यांनी केले. या संदर्भात दहीहंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता असताना त्याच पक्षातील आमदार जर राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन करत असेल, तर सामान्य नागरिकांनी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. आमदार मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी पुढील कारवाई होईल का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे.

हेही वाचा - अमरावती जिल्ह्यातील सर्व दुकाने आता रात्री आठपर्यंतच राहणार सुरू; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.