ETV Bharat / state

Uncle Killed Nephew : मुलासोबत बोलत असल्याच्या रागातून काकाने केला पुतणीचा खून; दोघांमध्येही होते अनैतिक संबंध

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 5:23 PM IST

Uncle Killed Nephew : रात्रीच्या सुमारास बाहेरील तरुणासोबत बोलत असल्याचा (uncle killed his nephew) राग येऊन काकानेच आपल्या विवाहित पुतणीला संपवल्याची (Nephew killed due to immoral relationship) धक्कादायक घटना घडली. हा प्रकार बुधवारी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील खडकी भागात घडला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Kopargaon murder case)

Woman Murder Case Kopargaon
काकाने केला पुतणीचा खून

कोपरगाव (अहमदनगर) : Uncle Killed Nephew : मृत तरुणीच्या आईने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, रात्री उशिरा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

काय आहे घटनाक्रम? : बुधवारी रात्री मृत मुलगी ही बाथरुमसाठी घराबाहेर येऊन एका मुलासोबत बोलत होती. यावेळी तिच्या काकाने बाहेरील मुलासोबत बोलत असल्याच्या कारणावरून संशय घेऊन तिच्यावर हल्ला केला. यानंतर तिला जबर जखमी करून ठार मारले. मृत मुलीचे तिच्या काकासोबत गेल्या अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी दिली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत.

कोपरगाव शहरातील खडकी परिसरात बुधवारी रात्री आरोपीने विवाहित पुतणीचा खून केला. या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. रात्री मृत महिला तिच्या काकाला एका मुलाशी बोलताना आढळली. याविषयी आरोपी काकाने तिला जाब विचारला असता दोघांत वाद झाला. यानंतर आरोपी काकाने पुतणीचा खून केला. तिला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले गेले. पण, अतिरक्तस्त्रावामुळे तिचा मृत्यू झाला. फरार आरोपी काकाला पोलिसांनी अटक केली आहे - प्रदीप देशमुख, पोलीस निरीक्षक

पुतणी-काकामध्ये अनैतिक संबंध : मुलासोबत बोलण्याच्या रागातून काकाने पुतणीचा खून केलाय. दरम्यान, आरोपी काकाचे मृत पुतणीसोबतच अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा:

  1. Vasai Murder : पत्नीनेच काढला पतीचा काटा; पतीच्या हत्येची दिली 1 लाखात सुपारी
  2. Two Murders In Nagpur : नागपुरात १२ तासात दोन हत्या; कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क
  3. Satara Crime : अनैतिक संबंधातून विवाहित तरूणाची हत्या; शेतात पुरला मृतदेह, पत्नीसह एक ताब्यात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.