ETV Bharat / state

शिर्डीत विरुध्द दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक; रिक्षा चालकासह दोन भाविक किरकोळ जखमी

author img

By

Published : Jan 21, 2020, 3:07 AM IST

शिर्डी शहरातील नगर मनमाड रोडवर पिंपळवाडी रोड चौक येथे एका मालवाहतूक ट्रकने रस्त्याच्या उलट दिशेने येत अनेक वाहनांना धडक दिली आहे. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

ahamadnagar
शिर्डीत विरुध्द दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक; रिक्षा चालकासह दोन भाविक किरकोळ जखमी

अहमदनगर - शिर्डी शहरातील नगर मनमाड रोडवर पिंपळवाडी रोड चौक येथे एका मालवाहतूक ट्रकने रस्त्याच्या उलट दिशेने येत अनेक वाहनांना धडक दिली आहे. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात ट्रकची ट्रॅव्हलर बस, बोलेरो, इनोवा कार, रिक्षा आणि तीन ते चार दुचाकींना धडक दिली. यामध्ये रिक्षाचा चुराडा झाला असून रिक्षा चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याशिवायही अन्य तीन जण जखमी झाले आहेत.

शिर्डीत विरुध्द दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक; रिक्षा चालकासह दोन भाविक किरकोळ जखमी

हेही वाचा - अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळामध्ये भ्रष्टाचार झाला.. रोहित पवारांची चौकशीची मागणी

मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास एका भरधाव जाणाऱ्या ट्रकने नगर मनमाड रोडवर पिंपळवाडी रोड चौकात रस्त्याच्या उलट दिशेने येत अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला की गाडीचे ब्रेक फेल झाले हे अद्याप समजू शकले नाही. एका अज्ञात व्यक्तीने ट्रकवर ताबा मिळवत ट्रक नियंत्रणात आणल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील लोकांनी अपघातस्थळी एकच गर्दी केली. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

Intro:





ANCHOR_ आज रात्री दहाच्या सुमारास एका भरधाव जाणाऱ्या ट्रकचे नगर मनमाड रोडवर पिंपळवाडी रोड चौकात एका मालवाहतुक करणार्या ट्रकने रस्त्याच्या उलट दिशेने अनेक गाड्या उडवले आहेत..यामध्ये एक ट्रॅव्हलर बस, एक बोलेरो, एक इनोवा व तीन-चार मोटर सायकल यांना धडकत गाडीने अनेकांना जखमी केले आहे..यामध्ये एका रिक्षाचा चुराडा झाला असून ड्रायव्हरच्या डोक्याला दुखापत झाली आहे. याशिवायही तीन जण जखमी झाले आहेत. ड्रायव्हर चा गाडी वरील ताबा सुटला की अ गाडीचा ब्रेक फेल झाला हे समजू शकले नाही कोणीतरी अन्य व्यक्तीने गाडी नियंत्रणात आणण्याचे कळतेय घटनेनंतर शेकडो लोकांनी गाडीला गराडा घातला असून जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे....Body:mh_ahm_shirdi_ accident_21_pkg_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_ accident_21_pkg_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.