ETV Bharat / state

साईसंस्थानच्या कोविड सेंटरसह राहता तालुक्यातील खासगी रुग्णालयात काही तास पुरेल इतकेच ऑक्सिजन

author img

By

Published : Apr 26, 2021, 8:01 PM IST

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरसह राहाता तालुक्यातील खासगी रुग्णालयांना ऑक्सीजन सिलिंडर मिळणे बंद झाल्याने शिर्डी व राहात्यातील खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. खासगी रूग्णालयांकडे काही तास पुरेल इतकेच ऑक्सिजन शिल्लक आहे.

शिर्डी (अहमदनगर) - साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरसह राहाता तालुक्यातील खासगी रूग्णालयांना ऑक्सीजन सिलिंडर मिळणे बंद झाल्याने शिर्डी व राहात्यातील खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. खासगी रूग्णालयांकडे काही तास पुरेल इतकेच ऑक्सिजन शिल्लक आहे.

कोपरगाव आणि राहाता तालुक्याला, संगमनेर येथून ऑक्सीजन सिलिंडरचा पुरवठा होतो. कोपरगावला दोन सब एजन्सी असून त्यांना सिन्नर, संगमनेरमधून पुरवठा होतो. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून हा पुरवठा थांबवण्यात आला आहे. संगमनेर येथील रूग्णालयांनाही पुरेसा ऑक्सिजन मिळेनासा झाल्याने संगमनेरकरांनी बाहेर ऑक्सिजन देणे थांबवले आहे. यामुळे कोपरगाव व राहाता तालुक्यातील रूग्णालयेच व्हेंटिलेटरवर गेली आहेत. यातील काही रूग्णांलयाकडे सायंकाळपर्यंत तर काहींकडे रात्रीपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक आहे.

एकीकडे रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असतांना ऑक्सिजन पुरवठा थांबल्याने शिर्डी, राहाता व कोपरगावातील रुग्णालयांनी ऑक्सीजन आवश्यक असणारे पेशंट अ‍ॅडमीट करून घेणे थांबवले आहे. तर अन्य रूग्णांना इतरत्र हलवण्याच्या सुचना रूग्णालयांनी नातेवाईकांना दिल्या आहेत. ज्या रूग्णालयांकडे ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर आहेत. त्यांच्याकडे सौम्य व मध्यम ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रूग्णांवर उपचार करणे शक्य आहे. मात्र, गंभीर रूग्णांच्या उपचाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रांताधिकार गोविंद शिंदे, आणि तहसिलदार कुंदन हिरे हे ऑक्सिजन मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. पाठपुराव्यानंतर नगरवरून थोडे सिलिंडर मिळणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, संबधित प्लॅन्टसमोर ऑक्सिजनसाठी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे तेथूनही ऑक्सिजन मिळेल की नाही, याची खात्री नाही. ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संगमनेरच्या पुरवठादाराने नकार दिला आहे. औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला आहे. ते पन्नास सिलिंडर देणार आहेत. काही दिवस रोज पुरवठा करण्याबाबत त्यांना विनंती केली आहे. पोकळे यांच्या प्लांटला लिक्वीड मिळवण्याचाही प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली आहे.

हेही वाचा - अहमदनगर - वाढत्या मृतसंख्येमुळे एकाच ठिकाणी होणाऱ्या अंत्यसंस्कारावर वादंग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.