ETV Bharat / state

Accused Beaten By Mob : अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या नराधमाला जमावाकडून बेदम मारहाण; आरोपींना अटक

author img

By

Published : Jun 10, 2022, 1:55 PM IST

Updated : Jun 10, 2022, 3:01 PM IST

The Mob Beat The Accused
आरोपील मारहाण करताना जमाव

अहमदनगरमध्ये (In Ahmednagar) 4 वर्षांच्या चिमुरड्यासोबत अनैसर्गिक कृत्य (Unnatural Acts with Little Boy) करणाऱ्या आरोपीला उपस्थितांनी जबर मारहाण केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. (Accused Dies After Being Beaten) या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी 4 आरोपींना अटक (4 Accused Arrested) केली आहे. अत्यंत नाजूक परिस्थिती असतानाही कायदा हातात घेऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते.

अहमदनगर : अहमदनगरमध्ये 4 वर्षांच्या चिमुरड्यासोबत अनैसर्गिक कृत्य (Unnatural Acts with Little Boy) करणाऱ्या आरोपीला उपस्थितांनी जबर मारहाण केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. अत्यंत नाजूक परिस्थिती असतानाही कायदा हातात घेऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते.

आरोपील मारहाण करताना जमाव

जमावातील आरोपींना केली अटक : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र नायर, अजहर शेख, सिकंदर शाह, सोमनाथ गायकवाड या आरोपींना पोलिसांनी 302 अन्वये अटक केली आहे. राजेश सोनार नावाच्या व्यक्तीने 4 वर्षांच्या चिमुरड्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. चार दिवसांपूर्वी ही घटना समोर आली होती. तोफखान पोलिसांत राजेश सोनार याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पेलिसांनी संबधित प्रकार बघून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

अशी घडली घटना : राजेश सोनार हा आणि तक्रारदार एकाच गल्ली राहत होते. अवघ्या चार वर्षांच्या चिमुरड्यावर अत्याचार केल्याने राजेश सोनार याला उपस्थित चार जणांनी बेदम मारहाण केली. राजेश सोनार हा जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले. चार दिवस त्याचावर उपचार सुरू होते. दरम्यान, बुधवारी उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी या घटनेची दखल घेत व्हायरल व्हिडीओ मयत आरोपीस मारहाण करणाऱ्या चौघांना अटक केली आहे.

पोलिसांनी कायदा पाळण्याचे केले आवाहन : पोलीस असो किंवा सामान्य नागरिक कोणालाही कायदा हातात घेण्याचा आधिकार नाही. आरोपी असेल तर त्याला शिक्षा देणाचा अधिकार न्यायालयाला आहे. सदर घटनेतील आरोपीने अत्यंत घृणास्पद गुन्हा केला होता. त्याच्या रिअ‍ॅक्शनमध्ये त्याला मारहाण करण्यात आली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून, मारहाण करणाऱ्यांविरोधात भादवि 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे एसपी मनोज पाटील यांनी स्पष्ट केले आहे. उपस्थित जमावाने आरोपी राजेश सोनार याला बेदम मारहाण केली. त्यात आरोपीचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याची हत्या करणाऱ्या 4 आरोपींना अटक केली आहे.


हेही वाचा : अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करणार्‍या सोनार बाबाचा नागरिकांच्या मारहाणीत मृत्यू

Last Updated :Jun 10, 2022, 3:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.