Chhatrapati Shivaji Maharaj Photo on Flex : छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेला फ्लेक्स हटण्याची शिवसेनेची मागणी, वाचा काय आहे प्रकरण?

author img

By

Published : Jan 22, 2023, 4:31 PM IST

Etv BharatRemove Shivaji Maharaj Plaque

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपचे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमच्या भावाने छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेला फ्लेक्स बोर्ड लावल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. हा फलक हटवण्याची विनंती उद्धव ठाकरे याच्या शिवसेने केली आहे. युवासेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी हिंदू जन जागरण सभा आयोजन समितीकडे फ्लेक्स काढण्याची मागणी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेला फ्लेक्स हटण्याची शिवसेनेची मागणी

अहमदनगर - शहरात आज रविवारी हिंदू जनजागृती सभा होणार असून ठिकठिकाणी सभेचे फ्लेक्स विविध हिंदुत्ववादी संघटनाकडून लावण्यात आले आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलेल्या भाजपच्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या भावाने छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेला फ्लेक्स लावल्याने नवीन वाद समोर आला आहे.

फ्लेक्स हटवा - उद्धव ठाकरे गटाचे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी हा बोर्ड काढून टाकण्याची मागणी हिंदू जन जागरण सभा आयोजन समितीकडे केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या छिंदमांना फोटो लावण्याचा अधिकार नाही अशी त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. हा फ्लेक्स हटवला नाही तर, शिवसेना ठाकरे गटाचे कोणीही आज रविवारी होणाऱ्या हिंदू जनजागृती सभेला उपस्थित राहणार नाही असा इशारा विक्रम राठोड यांनी आयोजकांना दिला आहे.

फ्लेक्स मुळे शहरात तणाव - श्रीपाद छिंदम उपमहापौर असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने छिंदमबद्दल नागरिकांत रोष आहे. भाजपने त्याला पक्षातून निलंबित केलेले आहे. अशात छिंदमच्या वतीने लावण्यात आलेल्या फ्लेक्सला शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेत इशारा दिल्याने परिसरात तणावाचे वातावरण होऊ शकते. यादृष्टीने पोलीस प्रशासन परस्थितीवर काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहे.

काय आहे प्रकरण - फेब्रुवारी 2018 मध्ये मनपात तत्कालीन भाजपचे उपमहापौर असलेले श्रीपाद छिंदम यांनी महापालिकेमध्ये कामे वेळेवर होत नसल्याने महापालिकेतील कर्मचारी बिडवेंना फोनवरुन दमदाटी केली होती. तसेच त्याच्याशी बोलताना छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द उच्चारले होते. या घटनेची दखल महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी सुरुवातीला घेतली होती. तात्काळ या संदर्भामध्ये ही बाब त्यांनी त्या वेळेला वरिष्ठांना त्यांनी सांगितली होती. ही घटना घडल्यानंतर छिंदमच्या त्या वक्तव्याची ऑडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल झालेली होती. त्याचे तीव्र पडसाद जिल्ह्यासह राज्यामध्ये उमटले होते.

छिंदमवर गुन्हा दाखल करण्याची मागणी - तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या कार्यालयावर सुद्धा त्यावेळी दगडफेक करण्यात आली होती. छिंदम याच्या दिल्लीगेटजवळील कार्यालयावरसुद्धा हल्ला करण्यात आला होता. त्याच्या निषेधाचे फलक सर्वत्र लावण्यात आले होते. दिनांक 16 फेब्रुवारी 2018 रोजी ही घटना घडल्यानंतर अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रितपणे येऊन छिंदमवर गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती.

तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल - शिवसेनेचे उपनेते (स्व.) अनिल राठोड यांनी पदाधिकार्‍यांसह त्यावेळेस तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत यासंदर्भात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. त्या वेळेला राज्याचे तत्कालीन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. शिवसेनेचे त्यावेळचे शहरप्रमुख संभाजी कदम, दिलीप सातपुते यांनी तोफखाना पोलिस ठाण्यांमध्ये पहिला तक्रार अर्ज त्याच्याविरोधात दिला होता. त्यानंतर शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा - Sanjay Raut News : विरोधकांनी भारत जोडो यात्रेत केवळ चार किलोमीटर तरी चालवून दाखवावे - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.