ETV Bharat / state

शिर्डी साई संस्थान विश्वस्त पदासाठी स्थानिकांना डावलल्याने शिवसैनिक नाराज, तर अध्यक्षपदावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत तिढा

author img

By

Published : Jun 24, 2021, 4:26 PM IST

शिर्डी
शिर्डी

ठाकरे सरकारने शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची यादी जाहीर केली आहे. मात्र, विश्वस्त मंडळ नेमताना शिर्डीतील स्थानिक निष्ठावंत शिवसैनिकांना डावलले गेल्याने शिवसैनिकांमधून नाराजीच सुर उमटत आहे. तसेच, राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये साई संस्थानच्या अध्यक्षपदावरून तिढा निर्माण झाला आहे.

शिर्डी - अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी साईबाबा संस्थानवर विश्वस्त मंडळ नेमताना शिर्डीतील निष्ठावंत शिवसैनिकांना डावलले गेल्याने शिवसैनिकांमधून नाराजीच सुर उमटत आहे. महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या विश्वस्त मंडळ यादीत शिवसेनेच्या केवळ चारच संभाव्य विश्वस्तांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे शिर्डीकरांचा विश्वस्त नेमणुकीत विचार करावा, यासाठी आता शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तसेच, स्थानिक शिवसैनिकांना साई संस्थानच्या विश्वस्त पदाची संधी देण्याची मागणी केली जाणार आहे.

शिर्डी साई संस्थान विश्वस्त मंडळ यादीवरून शिवसैनिकात नाराजी

विश्वस्त पद न मिळाल्याने शिवसैनिक नाराज

शिर्डी साईबाबा संस्थानवर राज्य सरकारने विश्वस्त मंडळ नियुक्त करावे, असे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची काल (23 जून) मुंबई येथे बैठक पार पडली. बैठकीनंतर तिन्ही पक्षांनी आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची विश्वस्त मंडळाची यादी जाहीर केली. मात्र, यामध्ये शिवसेनेकडून स्थानिक शिवसैनिकांनी प्राधान्य दिले गेले नाही. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. या यासंदर्भात स्थानिक शिवसैनिकांना साईबाबा संस्थान विश्वस्त पद मिळावे, यासाठी शिर्डीतील शिवसैनिकांचे एक शिष्टमंडळ येत्या दोन दिवसात मुंबईत जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. स्थानिक शिवसैनिकांना विश्वस्त मंडळात प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येणार आहे. याची माहिती शिवसेनेचे नेते संजय शिंदे यांनी दिली आहे.

विश्वस्त मंडळाची यादी जाहीर

महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेला साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळ यादी जाहीर केली. यात राष्ट्रवादीकडे साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद, तर शिवसेनेकडे साईबाबा संस्थानचे उपाध्यक्षपद असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे कुठेतरी काँग्रेसमध्ये नाराजी आहे.

राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये साई संस्थांच्या अध्यक्षपदावरून तिढा?

साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद काँग्रेस पक्षाला हवे, यासाठी कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे कुठेतरी अध्यक्षपदावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये तिढा निर्माण झाली आहे. यामुळेच राज्य सरकारने औरंगाबाद उच्च न्यायालयात साई संस्थान विश्वस्त मंडळ नेमण्याची दोन आठवड्याची वाढीव मुदत मागितली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा साई संस्थांच्या अध्यक्षपदावरून तिढा सुटणार का? येत्या दोन आठवड्यात साईबाबा संस्थानवर विश्वस्त मंडळ नियुक्ती करण्यात येणार का? याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - पुण्यात आत्मदहनाचा प्रयत्न, अतिक्रमण हटाव पथक आणि नागरिकांमध्ये जोरदार झटापट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.