ETV Bharat / state

नववर्षाच्या स्वागतासाठी साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, पाहा व्हिडिओ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 31, 2023, 4:32 PM IST

Shirdi New Year
Shirdi New Year

Shirdi New Year : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साई मंदिर परिसरात फुलांची सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी हजारो फुलांचा वापर करण्यात आलाय. पाहा या सजावटीचा खास व्हिडिओ

पाहा व्हिडिओ

शिर्डी (अहमदनगर) Shirdi New Year : देशभरात सध्या नववर्षाची धूम आहे. लहानांपासून मोठे सर्वजण नवीन वर्षाचं स्वागत करण्यास उत्सुक आहेत. शिर्डीच्या साईबाबा संस्थानाकडूनही नववर्षाची जय्यत तयारी करण्यात आलीये. नवं वर्षं साईबाबांच्या शिर्डीत साजरं करण्यासाठी तेथे भक्तांची गर्दी होते आहे.

शिर्डीत भाविकांची गर्दी जमली : शिर्डीत दरवर्षी न्यू ईयरला देश-विदेशातील भाविकांची गर्दी होते. यानिमित्त साई मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण मंदिर परिसर उजळून गेलाय. याशिवाय मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. साई मंदिराचा गाभारा तसेच मंदिराचा आसपासचा परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलाय.

सजावटीसाठी हजारो फुलांचा वापर : साई मंदिर परिसराच्या सजावटीसाठी हजारो फुलांचा वापर करण्यात आलाय. गेल्या सहा दिवसांपासून तब्बल ६० कारागीर फुलांची सजावट करत होतो. यासाठी सुमारे १० लाख रुपयांचा खर्च झाला. साई भक्तांच्या देणगीतून हा खर्च करण्यात आलाय. या वर्षीच्या सजावटीचं एक खास आकर्षण आहे. साई मंदिराच्या ज्या खिडकीतून साईबाबांचा चेहरा दिसतो, त्या खिडकी बाहेर रामरथाची प्रतिकृती फुलांनी बनविण्यात आली असून त्या रथात साईबाबा विराजमान झाले आहेत.

साई मंदिर रात्रभर खुलं राहणार : नववर्षांच्या पार्श्वभूमीवर भक्तांची गर्दी पाहता साई संस्थाननं मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दर्शन रांगेतील भाविकांसाठी रात्रभर मोफत चहा, बिस्कीटची व्यवस्था आहे. तसेच व्हिआयपी दर्शन पासेसही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या काळात शिर्डी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी नगर-मनमाड मार्गावरील वाहतूक रिंगरोडनं वळविण्यात आलीय.

हे वाचलंत का :

  1. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल, साई मंदिर आज राहणार रात्रभर खुलं
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.