ETV Bharat / state

Sri Shirdi Sai Baba Mandir : गुरुपौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी घेतलं साईचं दर्शन, 5.12 कोटींची गुरुदक्षिणा

author img

By

Published : Jul 18, 2022, 11:07 AM IST

गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूदक्षिणा
गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूदक्षिणा

सबका मलिक एकचा महामंत्र देणाऱ्या साईबाबांच्या गुरुपौर्णिमा उत्सवात ( Gurupurnima festival ) देश- विदेशातून सुमारे 3 लाखांहून अधिक भाविकांनी शिर्डीत ( Sai Baba Shirdi ) येत साई समाधीचे दर्शन घेतले. या दरम्यान सुमारे 5 कोटी 12 लाख 408 रुपयांची विक्रमी गुरुदक्षिणा साईंना अर्पण केली आहे.

शिर्डी ( अहमदनगर) - साईबाबांच्या शिर्डीत ( Sai Baba Shirdi ) 3 दिवस चाललेल्या गुरुपौर्णिमा ( Guru Purnima ) उत्सवात साईभक्तांनी साईबाबांना दिलेल्या दानाची मोजदाद करण्यात आली. बाबांना गुरू मानत साईचरणी आपली गुरूभक्ती व्यक्त करताना गुरूला गुरूदक्षिणा ( Gurupurnima festival ) म्हणून भाविक ( devotee ) भरभरून दान दिले आहे. या गुरुपोर्णिमा उत्सवात 3 लाख भाविकांनी साई समाधीच दर्शन घेतल आहे. सुमारे 5 कोटी 12 लाख 408 रुपयांची विक्रमी गुरुदक्षिणा साईंना अर्पण केली आहे.

साई समाधीचे दर्शन - सबका मलिक एकचा महामंत्र देणाऱ्या साईबाबांच्या गुरुपौर्णिमा उत्सवात ( Gurupurnima festival ) देश- विदेशातून सुमारे 3 लाखांहून अधिक भाविकांनी शिर्डीत ( Sai Baba Shirdi ) येत साई समाधीचे दर्शन घेतले. या दरम्यान सुमारे 5 कोटी 12 लाख 408 रुपयांची विक्रमी गुरुदक्षिणा साईंना अर्पण केली आहे. यात 12 देशांतील 19 लाख 80 हजार 94 रुपयांच्या परकीय चलनाचाही समावेश आहे. देश- विदेशात कोट्यवधी साईभक्त दरवर्षी शिर्डीत दर्शनासाठी येतात. ते श्रद्धेतून बाबांच्या झोळीत भरभरून दानही अर्पण करतात. याच दानातून संस्थानाने पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत.

आरोग्यसेवेचा मंत्र जोपासण्यासाठी 2 रुग्णालय - साईंच्या आरोग्यसेवेचा मंत्र जोपासण्यासाठी 2 रुग्णालये उभारत गोरगरिबांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जाते. साईभक्तांना शिर्डीत निवासासाठी अद्ययावत भक्त निवासेही उभारण्यात आली आहेत. आशिया खंडातील सर्वाधिक मोठे सोलार सिस्टिमवर चालणाऱ्या प्रसादालयाची निर्मिती करून दररोज 50 हजारांवर भाविकांना मोफत भोजन प्रसाद दिला जातो. सामान्य मुलांच्या शिक्षणासाठी उच्च दर्जाच्या शैक्षणिक संकुलाची निर्मिती करण्यात आली आहे.

शिर्डीत असाही एक विवाहा सोहळा - गेल्या 21 वर्षा पासुन शिर्डीत सामुदायीक विवाह सोहळ्याची मोठी चळवळ उभी राहीली असुन आज पर्यंत 2000 विवाह पार पडले आहेत. सर्व धर्मीयांच्या या सामुदायीक विवाह सोहळ्यात शिर्डीतील ग्रामस्थ सर्व जबाबदारी लिलया पार पाडतात. सर्वसमान्य कुटुबातील वधु-वरांच लग्न अगदी शाही थाटात पार पाडण्यात येते. शाहीथाटात पार पडलेल्या या सामुदायीक विवाह सोहळ्यासाठी हजारो वऱ्हाडी मंडळी सह साधुसंत आणि राजकारण्यांनी हजेरी लावली होती. विवाह बंधनात अडकलेल्या वधु-वरांना साई सिध्दी चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने संसार उपयोगी साहीत्य भेट स्वरुपात देण्यात आलेय.

सव्वा रुपयात लग्न - सर्व धर्मियांचे श्रद्धा स्थान,अशी देश-विदेशात ओळख निर्माण झालेल्या साईबाबांची शिर्डी या धार्मिक स्थळी दरवर्षी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह आयोजित करण्यात येतात. अवघ्या ‘सव्वा रुपयात लग्न’ करण्याची सोय असलेला हा सामाजिक उपक्रम पैशाअभावी रखडलेल्या गोर-गरीब कुटुंबातील उपवर मुला-मुलीसाठी मोठा आधार बनला आहे. महारष्ट्रातीलच नव्हे तर इंतर राज्यातील गरीब कुटुंबातील उपवर मुले-मुली येथे येऊन लग्न लावतात.

1908 साली गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरवात - 115 व्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरवात सन 1908 साली सुरु झाली. त्यानंतर आजपर्यंत अनेक भक्त साईबाबांना गुरु मानत त्याचा आशिर्वाद घेण्यासाठी खास करुन गुरुपौर्णिमा ला शिर्डीला येतात. गुरुपौर्णिमा अर्थात व्यास पोर्णिमा ही एकच दिवस असते. मात्र, शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सव 3 दिवस साजरी करण्याची एक अनोखी परंपरा चालत आली आहे.

गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी शिर्डीतील साईबाबा मंदीरात काकड आरती झाल्यानंतर साईबाबांची प्रतिमा आणि पोथी, वीणा घेऊन साईमंदिरातून तुतारी, ताशा वाजवत मिरवणुक काढली जाते. या मिरवणुकीूत यावर्षी संस्थानचे विश्‍वस्‍त डॉ. एकनाथ गोंदकर यांनी पोथी, विश्वस्त सचिन कोते व विश्‍वस्‍त डॉ. जालिं‍दर भोर यांनी प्रतीमा तर विश्वस्त सुनिल शेळके यांनी विणा घेवून सहभाग घेतला होता. ही मिरवणुक द्वारकामाईत पोहचल्यानंतर येथे साई चरीत्राच्या अखंड पारायणास सुरवात झाली.

हेही वाचा - Voting For President Election Today : राष्ट्रपती पदासाठी आज मतदान; द्रौपदी मुर्मू, यशवंत सिन्हा आहेत उमेदवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.