ETV Bharat / state

कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर यंदाही साईसच्‍चरित पारायण सोहळा आभासी पध्‍दती -कान्‍हूराज बगाटे

author img

By

Published : Aug 7, 2021, 2:17 PM IST

कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर साईबाबा संस्‍थानच्‍यावतीने दि.०५ एप्रिलपासून साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरता साईभक्‍तांना बंद ठेण्‍यात आलेले आहे. त्‍यामुळे मागील वर्षाप्रमाणे यावर्षी आयोजित करण्‍यात येणारा २७ वा श्री साईसच्‍चरित पारायण सोहळा आभासी पध्‍दतीने साजरा करण्‍यात येणार आहे, असे बगाटे यांनी सांगितले आहे.

sai sachcharit parayan ceremony will be celebrated in a virtual manner
कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर यंदाही साईसच्‍चरित पारायण सोहळा आभासी पध्‍दती

शिर्डी (अहमदनगर) - शिर्डी साईबाबा संस्‍थानच्या तसेच नाटय, रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या सहकार्याने दरवर्षी श्रावण शुध्‍द प्रतिपदेपासून सुरू होणारा श्री साईसच्‍चरित पारायण सोहळा साजरा केला जातो. कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही हा सोहळा आभासी पध्‍दतीने साजरा करण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी दिली आहे.

यंदाही साईसच्चरीत पारायण सोहळा अभासी -

गेल्‍या वर्षी जगभरात व देशात आलेल्‍या कोरोना विषाणूच्‍या संकटामुळे साईबाबांचे समाधी मंदिर बंद करण्‍यात आले होते. नंतर राज्‍य शासनाच्‍या आदेशाने दि.१६ नोव्हेंबर २०२० पासून साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी शर्तींवर/खुले करण्‍यात आले होते. परंतु, सध्‍या पुन्‍हा राज्‍यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना केलेल्‍या आहेत. यामध्‍ये धार्म‍िक स्‍थळे, सामाजिक ठिकाणे आदी ठिकाणी गर्दी होवू नये अथवा करु नये, असे निर्देश देण्‍यात आलेले आहे. याच पार्श्‍वभूमीवर साईबाबा संस्‍थानच्‍यावतीने दि.०५ एप्रिल रोजीपासून साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता साईभक्‍तांना बंद ठेण्‍यात आलेले आहे. त्‍यामुळे मागील वर्षाप्रमाणे यावर्षी आयोजित करण्‍यात येणारा २७ वा श्री साईसच्‍चरित पारायण सोहळा आभासी पध्‍दतीने साजरा करण्‍यात येणार आहे, असे बगाटे यांनी सांगितले आहे.

या वेळेत होईल साईसच्‍चरित पारायण -

श्री साईसच्‍चरित पारायणाचे वाचन हे दिनांक ०९ ऑगस्‍ट ते दिनांक १६ ऑगस्‍ट २०२१ या कालावधीत सकाळी ०७.०० ते ११.०० यावेळेत साईसमाधी स्‍टेजवर संस्‍थान पुजाऱ्यांमार्फत करण्‍यात येणार आहे. तसेच यावेळेत पारायण वाचनाचे युट्युब (youtube) - https://youtube.com/user/saibabasansthantrust, फेसबुक पेज (Facebook Page) - https://www.facebook.com/shrisaibabasansthantrustshirdi/ व वेबसाईट (website) - www.sai.org.in या लिंकवर थेट प्रक्षेपण करण्‍यात येणार असल्‍याचे बगाटे यांनी सांगितले आहे. तसेच, सर्व साईभक्‍तांनी आपल्‍या घरीच यावेळेत पारायण वाचन करावे असे आवाहन ही बगाटे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.