ETV Bharat / state

बालमटाकळीत एकाच रात्रीत चार घरफोड्या; दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

author img

By

Published : Dec 29, 2019, 2:32 PM IST

बालमटाकळी येथे काल (शनिवार) मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार ठिकाणी घरफोडी करून दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केले. तर तीन ठिकाणी घरांचे कुलूप तोडून चोरी करण्याचाही प्रयत्न केला. परंतु, नागरिकांनी चोरीचा डाव उधळून लावला.

बालमटाकळी
घरफोडी

अहमदनगर- शेवगाव तालुक्यातील पूर्व भागात बालमटाकळी येथे काल (शनिवार) मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चार ठिकाणी घरफोडी करत सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. तर तीन ठिकाणी घरांचे कुलूप तोडून चोरी करण्याचाही प्रयत्न केला. परंतु, नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरी करण्याचा डाव फसला. मात्र, या घटनांमुळे गावात भीती निर्माण झाली आहे.

या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी, की बालमटाकळी येथील वस्तीत राहणाऱ्या शिवाजी राजपूरे यांच्या राहत्या घरी दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून एकूण २६ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास करत घरातील साहित्याची नासधूस केली. तसेच गावातील राम मंदिराशेजारी असलेले मंदाबाई शिवाजी साबळे यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी ६ ग्रॅम सोन्याचे दागिने व सहा हजार रोख रक्कम घेऊन घरातील सर्व सहित्याची नासधूस केली. यानंतर बालंबिका देवी मंदिराच्या काही अंतरावर असलेले गोरख बापूराव तिडके यांचेही घर फोडून दीड हजारांची रोख रक्कम व घरातील साहित्य घेऊन चोरटे पसार झाले. तर गावातील अन्य तीन ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरी करण्याचा डाव फसला. हा सर्व प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर गावात भीतीचे वातावरण पसरले होते.

बालमटाकळीसह परिसरातील सर्वसामान्य जनतेबरोबरच येथील मंदिरे, दुकाने, बाजारपेठ सुरक्षित नाहीत. मागील काही दिवसांपूर्वी देखील बालमटाकळी येथे श्री बालंबिका देवी मंदिर व हनुमान मंदिरातील दानपेटया चोरत चोरट्यांनी येथे धाडसी चोरी केली होती. त्याच घटनांचा अद्याप तपास लागला नसून पुन्हा येथे धाड़सी चोरी झाली आहे. त्यामुळे चोरट्यांनी देखील पोलीसांना एक प्रकारचे खुले आव्हान दिल्याचे चित्र या भागात निर्माण झाले आहे. या भागात वाहन चोरी, घरफोड़ी, मोबाईल चोरी, या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिंकामध्ये भय पसरले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेबद्दल नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून दबक्या आवाजात लोक पोलीस प्रशासनाविरोधात चर्चा करीत आहेत.

Intro:बालमटाकळीत एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी तर तीन ठिकाणी चोरीचा प्रयन्त अयशस्वी,Body:बालमटाकळीत एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी तर तीन ठिकाणी चोरीचा प्रयन्त अयशस्वी,
बालमटाकळीच्या मध्यवस्तीत चोरट्यांचा धुमाकूळ ; नागरीकात भितीचे वातावरण
बालमटाकळीत चोरीच्या सत्रात वाढ;  पोलिसांच्या मदतीला हवी नागरिकांची गस्त,
मागील चोऱ्यांचाच अद्याप तपास नाही,

शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील बालमटाकळी येथे दि. २८ रोजी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही अद्न्यात चोरट्यांनी पूर्ण गावात धुमाकूळ घालून चार ठिकाणी घरफोड़ी करुण सोंन्याच्या दागीण्यासह रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले तर तीन ठिकाणाचे घरांचे कुलुप तोडून चोरी करण्याचा प्रयन्त केला परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे तीन ठिकानाचा चोरी करण्याचा डाव त्यांचा फसला असून चोरट्यांनी पूर्ण गाव भयभीत करुण टाकले. सदरील घटने बाबत सविस्तर माहीती अशी आहे की, बालमटाकळी येथील मध्यवस्तीत राहणारे शिवाजी राजपुरे यांचे राहते बंद असलेल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार तोडून आतील खोलीतील एक दाराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला व घरामधील कपाटातील सोन्याचे दागिने गळ्यातील मनी पोत १० ग्रॅम, गळ्यातील एकदानी सर ७ ग्रॅम , कानातील बाजीगर टाप्स ९ ग्रॅम अशा मिळून एकूण २६ ग्रॅम सोन्याच्या ऐवज चोरून नेला व घरांच्या सर्व सहित्याची चोरट्यांनी नासधुस केली. तसेच राममंदिर शेजारी असलेले मंदाबाई शिवाजी साबळे यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व कानातील झुंबर ६ ग्रॅम व सहा हजार रोख रक्कम घेऊन घरातील सर्व सहित्याची नासधुस केली. तसेच बालंबिका देवी मंदिराच्या काही अंतरावर असलेले गोरख बापूराव तिडके यांचे राहते घर फोडून दीड हजारांची रोख रक्कम व काही घरातील साहित्य घेऊन चोरटे पसार झाले. तसेच योगेश पोकळे यांचे राहते घर फोडून घरातील सर्व साहित्याची नासधुस केली परंतु चोरट्यांना तेथे काहीच हाती नाही लागले. तर गावातील गणेश नगर येथील पांडुरंग चन्द्रकांत पोपळभट यांचे चोरट्यांनी राहत्या घराचे मुख्य प्रवेशद्वार व मागच्या दाराचे प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयन्त केला परंतु दार तोडण्याच्या होणाऱ्या आवाजाने घरातील लोक वेळीच जागे झाल्यामुळे चोरट्यांचा डाव तेथे फसला. तसेच राम मंदिर शेजारील गल्ली मधील राहत असलेले सुभाष देवा जोशी आणि त्यांचा जवळच राहत असलेले अशोक बामदळे यांचे देखील घरांचे मुख्य दाराचे कुलुप तोडण्याचा प्रयन्त चोरट्यांनी केला परंतु त्यांचा तो प्रयन्त अयशस्वी ठरला.सदरील हा सर्व चोरीचा प्रकार सकाळी गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर गावात भितीचे वातावरण पसरले होते. सदरील चोरींच्या घटनेची माहीती आमचे दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी इसाक शेख यांना समजताच त्यांनी बोधेगाव दूर क्षेत्राचे पोलीस नाईक अण्णा पवार यांना दूरध्वनी वरुण संबधित घटनेची माहीती देताच तात्काळ बोधेगाव येथील पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस नाईक अण्णा पवार यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल नामदेव पवार, पोलीस कॉन्स्टेबल हरिभाऊ धायतडक,पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र ढाकने,यांच्या पथकाने सदरील घटनेला भेट देऊन घटनेची सखोल पाहणी केली.
बालमटाकळी सह परिसरातील सर्व सामान्य जनतेबरोबरच येथील मंदिरे, दुकाने, बाजार पेठा सुरक्षित राहिल्या नाही मागील काही दिवसापूर्वी देखील बालमटाकळी येथे श्री बालंबिका देवी मंदिरात व हनुमान मंदिरातील दानपेटया चोरट्यांनी चोरून येथे धाडसी चोरी केली होती त्याचाच अद्याप तपास लागला नसून पुन्हा येथे धाड़शी चोरी झाली आहे. त्यामुळे चोरट्यांनी देखील पोलीसांना एक प्रकारचे खुले आवहानच केल्याचे चित्र या भागात दिसत आहे. या भागात नेहमी वाहन चोरी, घरफोड़ी, मोबाईल चोरी, यामध्ये वाढ झाल्याने नागरिकामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावर एक प्रकारचा रोष नागरिकांचा निर्माण झाला असून दबक्या आवाजात लोक पोलीस प्रशासनाविरोधात चर्चा करीत आहेत.Conclusion:बालमटाकळीत एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी तर तीन ठिकाणी चोरीचा प्रयन्त अयशस्वी,
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.