ETV Bharat / state

Ram Navami at Sai Temple Shirdi: शिर्डी साई मंदिरात आज पहाटेच्या काकड आरतीने रामनवमी उत्सवाला सुरुवात

author img

By

Published : Apr 9, 2022, 12:36 PM IST

Ram Navami celebration Kakad Aarti Shirdi
रामनवमी उत्सव साई बाबा मंदिर

शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात आज पहाटे काकड आरतीने रामनवमी उत्सवाला ( Ram Navami celebrations Shirdi Sai Temple ) सुरुवात झाली. आज पहाटेच्या काकड आरतीनंतर साई मंदिरापासून साईंची प्रतीमा, वीणा आणि साईसच्चरीत्र ग्रंथांची मिरवणूक साईंच्या व्दारकामाई पर्यंत नेण्यात आली.

अहमदनगर - शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात आज पहाटे काकड आरतीने रामनवमी उत्सवाला ( Ram Navami celebrations Shirdi Sai Temple ) सुरुवात झाली. आज पहाटेच्या काकड आरतीनंतर साई मंदिरापासून साईंची प्रतीमा, वीणा आणि साईसच्चरीत्र ग्रंथांची मिरवणूक साईंच्या व्दारकामाई पर्यंत नेण्यात आली. व्दारकामाईत अखंड पारायणाचे वाचन करण्यात आले. उत्सवानिमीत्त साईमंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. शिर्डीत तीन दिवस रामनवमी उत्सव साजरा केला जातो.

शिर्डी साई मंदिराचे दृश्य

हेही वाचा - Ram Navami In Shirdi : रामनवमीसाठी शिर्डी सजली, 97 हजार चौ.फुटांच्या मंडपासह भक्तांसाठी विविध सुविधा

उद्या रामनवमीचा मुख्य दिवस असल्याने उत्सवासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक पायी पालख्या घेवून शिर्डीत दाखल होत आहेत. रामनवमी उत्सव आणि पालखीचे एक वेगळे नाते असल्याने या उत्सवासाठी खासकरून मुंबईहून मोठ्या प्रमाणात पालख्या दाखल होतात. पंधरा दिवसांचा पायी प्रवास करून शिर्डीत येऊन साईंच्या दर्शनासाठी भाविक आतूर झालेला असतो. 111 वर्षांची परंपरा असणारा हा उत्सव आजही तितक्याच उत्साहाने साजरा केला जात आहे.

शिर्डीतील रामनवमी उत्सव हा शके 1833 म्हणजेच 1911 साली सुरू झाला. प्रथम हा उत्सव उरुसापोटी जन्माला आला. त्यावेळी केवळ मोठ्या प्रमाणात उरुसच शिर्डीत भरत असे. मात्र, साईभक्त भिष्म यांनी हा उरुस रामनवमी उत्सव म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची साईबाबांना विनंती केली. त्यावेळेपासून साईबाबांच्या आज्ञेनेच भिष्म आणि गोपाळराव गुंड या भाविकांनी रामनवमी उत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून आजपर्यंत ही पंरपरा आणि हा उत्सव सुरू आहे.

रामनवमी उत्सवाचे महत्व मोठ असल्याने या उत्सवात सहभागी होण्यासाठी भाविकांची मांदियाळी देशभरातून शिर्डीत जमते. अषाढीचे वेध लागले की, वारकऱ्यांची दिंडी ज्या प्रमाणे पंढरपूरकडे निघते त्याचप्रमाणे रामनवमीसाठी साईभक्तांच्या पायी पालख्या शिर्डीकडे येतात. मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत या प्रमुख शहारांच्या बरोबरीनेच अनेक गावांतूनही शिर्डीला भाविक पायी चालत येतात. पायी चालत आले की, आपले दुख, संकट दूर करून आपल्या मनोकामना साईबाबा पूर्ण करतात, अशी भाविकांची श्रद्धा असते. साई नामाच्या गजराने संपूर्ण शिर्डी दुमदुमून गेली आहे.

आज उत्सवाचा पहिला दिवस असल्याने रात्री साईंच्या पालखीची गावातून मिरवणूक काढली जाणार आहे. उत्सवाच्या निम्मीताने साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून साईमूर्तीलाही विविध अलंकारांनी सजविण्यात आले आहे. शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीने साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व राहण्याची व्यवस्था, तसेच जागोजागी मंडप व्यवस्थाही करण्यात आली आहे.

हेही वाचा - Minister Nitin Raut Ahmednagar :...अन् ऊर्जामंत्री नितीन राऊतांचे डोळे पाणावले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.