ETV Bharat / state

साई मंदिरात भक्तीमय वतावरणात राम नवमी उत्सव, बाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

author img

By

Published : Apr 10, 2022, 12:33 PM IST

शिर्डीत तीन दिवस साजरा केल्या जाणाऱ्या रामनवमी उत्सवाचा ( Ram Navami celebrations Sai Temple ) आजचा मुख्य दिवस आहे. आज पहाटे काकड आरतीला साईंच्या मूर्ती आणि समाधीला भाविकांनी आणलेल्या कवडीचे विधीवत पूजन करण्यात आले.

Ram Navami celebrations Sai Temple
रामनवमी शिर्डी पालखी

अहमदनगर - शिर्डीत तीन दिवस साजरा केल्या जाणाऱ्या रामनवमी उत्सवाचा ( Ram Navami celebrations Sai Temple ) आजचा मुख्य दिवस आहे. आज पहाटे काकड आरतीला साईंच्या मूर्ती आणि समाधीला भाविकांनी आणलेल्या कवडीचे विधीवत पूजन करत या सप्त नद्याच्या जलाने साईमूर्ती आणि साई समाधीला जलाभिषेक करण्यात आला.

साई मंदिराचे दृश्य

हेही वाचा - Silver Oak Attack : शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेला हल्ला निंदनीय : आमदार आशुतोष काळे

रामनवमी उत्सवात काल शनिवारी साईच्या पोथीची आणि पादुकांची मिरवणूक साईमंदिर ते द्वारकामाई अशी काढण्यात येवून, साई चरित्राच्या अखंड पारायण वाचण्यास सुरवात करण्यात आली होती. आज पुन्हा बाबांची पोथी, विणा आणि प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर साईचरीत्रच्या अखंड पारायण वाचनाची समाप्ती करण्यात आली.

शिर्डीच्या 111 व्या रामनवमी उत्सवाची कालपासून भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने साई दर्शनासाठी लाखो भाविकांची मांदियाळी शिर्डीत दिसून येत आहे. साईनामाचा जयघोष करत शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या. उत्सवासाठी साईबाबांच्या मदिराचा गर्भगृह आणि मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

आज मध्यान्ह आरतीअगोदर साईमंदिरासमोर रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. हजारो भाविकांनी राम जन्माचा मोठ्या भक्तीभावाने स्वागत केले. शिर्डीतील रामनवमी उत्सवाचे यंदाचे हे 111 वे वर्ष आहे. भाविकांमध्ये साई भेटीचा आनंद ओसंडून वाहत आहे. दोन वर्षानंतर भाविकांनी रामनवमीच्या दिवशी मदिरात जाऊन साईंचे दर्शन केले. रामनवमी उत्सवात सहभागी होण्यासाठी देशभरातून भाविक येथे येत असतात.

शिर्डीचा उत्सव हा भाविकांसाठी आनंद सोहळा असतो. साईबाबांच्या भेटीसाठी आतूर झालेला भक्तगण साई मूर्तीची केवळ एक झलक पाहण्यासाठी आसुसलेले असतात. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवातील उर्जा भाविकांना वर्षभर पुरणारी असते. त्यामुळेच, हा उत्सव याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक साई दरबारी दाखल झाले आहेत. जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ मिळावा याकरिता आज साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा - Ram Navami In Shirdi : रामनवमीसाठी शिर्डी सजली, 97 हजार चौ.फुटांच्या मंडपासह भक्तांसाठी विविध सुविधा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.