राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत उद्या महाराष्ट्रात, काँग्रेस अध्यक्षपदासंदर्भात चर्चेची शक्यता

author img

By

Published : Sep 22, 2022, 4:40 PM IST

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत उद्या महाराष्ट्रात

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत उद्या महाराष्ट्रात येत आहेत (Ashok Gehlot in Maharashtra tomorrow ). अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये ते एका कार्यक्रमाला येत आहेत. यावेळी काँग्रेस अध्यक्षपदासंदर्भात चर्चेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातही उपस्थित राहणार आहेत.

अहमदनगर - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत संगमनेरमध्ये येणार आहेत (Ashok Gehlot in Maharashtra tomorrow ). स्वातंत्र्यसैनिक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त शुक्रवार दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी संगमनेर यशोधन कार्यालय येथे येत आहेत. शेतकरी संघ प्रांगण येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री नामदार अशोक गेहलोत प्रमुख अतिथी असणार आहेत. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यावेळी उपस्थित असणार आहेत. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी ही माहिती दिली आहे.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ अ ह साळुंखे यांना पुरस्कार - काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यामार्गदर्शनाखाली जयंती महोत्सव हा दरवर्षी होत असतो. विविध क्षेत्रातील मान्यवरांना अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने एक लाख रुपये व सन्मानचिन्ह असलेल्या स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार व डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अ. ह. साळुंखे, डॉ.सुधीर भोंगळे व माजी मंत्री आणि मांजरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांना गौरवण्यात येणार आहे. शुक्रवार दु साडेबारा वाजता शेतकरी संघ प्रांगण यशोधन कार्यालया शेजारी हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात
काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात

गेहलोत थोरात यांच्यात चर्चेची शक्यता - यावेळी राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला वेगळे महत्व आहे. यानिमित्ताने काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे उमेदवार असणारे गेहलोत आणि काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांची भेट होणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आगामी भूमिकेसंदर्भात या कार्यक्रामाच्या पार्श्वभूमिवर चर्चा होण्याची शक्यता आहे (discuss regarding Congress presidency). बाळासाहेब थोरात हे पटोलंच्यापूर्वी राज्य काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांची गेहलोत यांच्यासंदर्भात काय भूमिका आहे. तसेच राज्यातील काँग्रेसचीच एकूण काय भूमिका आहे. यासंदर्भात दोघांच्या यानिमित्ताने चर्चा होऊ शकते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.