ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये उसाचा ट्रक उलटला, एकाचा मृत्यू

author img

By

Published : May 4, 2019, 7:12 PM IST

संगमनेर तालुक्यातील तळेगांव चौफूलीपासून काही अंतरावर असलेल्या विडी कारखान्याजवळ आज उसाचा ट्रक पलटी होवून अपघात झाला. या अपघातामध्ये एका निवृत्त बस कंडक्टरचा (वाहक) मृत्यू झाला आहे.

अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील तळेगांव चौफूलीपासून काही अंतरावर असलेल्या विडी कारखान्याजवळ आज उसाचा ट्रक पलटी होवून अपघात झाला. या अपघातामध्ये एका निवृत्त बस कंडक्टरचा (वाहक) मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी सहाच्या सुमारास घडली. भिमराज यशवंत दिघे (वय - ७३) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ट्रकखाली दबले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.

सेवानिवृत्त भिमराज दिघे नेहमीप्रमाणे रस्ता ओलांडून बिडी कारखान्याजवळील कचरा कुंडीत कचरा टाकण्यासाठी जात होते. त्यावेळी लोणीहून उसाने भरलेला ट्रक (एमएच-१२- एमव्ही- ९५१३) रस्त्याने भरधाव वेगात येत पलटी झाला. यामध्ये भिमराज दिघे ट्रकखाली दबले गेले. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेमुळे तळेगांव दिघे गावामध्ये शोककळा पसरली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

संगमनेर तालुक्यातील तळेगांव चौफूलीपासून काही अंतरावर असलेल्या विडी कारखान्याजवळ आज उसाचा उसाचा ट्रक पलटी होवून अपघात झाला. अपघातात निवृत्त बस कंडक्टर भिमराज यशवंत दिघे (वय - ७३) ट्रकखाली दबल्या गेल्याने ठार झाले. ही घटना शनिवार (४ मे) सकाळी सहाच्या सुमारास घडली.....

सेवानिवृत्त भिमराज दिघे नेहमीप्रमाणे रस्ता ओलांडून बिडी कारखान्याजवळील कचरा कुंडीत कचरा टाकण्यासाठी जात असतांना लोणीहून उसाने भरलेला ट्रक क्रमांक एमएच 12, एमव्ही 9513 भरधाव वेगाने येत असतांना रस्तावरील पादचा-यांचा अंदाज न आल्याने नियंत्रणा अभावी पलटी झाला. यावेळी भिमराज दिघे उसाच्या ट्रकखाली दबल गेले.रूग्नवाहिकेतून त्वरीत त्यांना दवाखान्यात हलविण्यात आले मात्र त्याची प्राणज्योत मावळली गेली होती.सदर घटनेमुळे तळेगांव दिघे गावात मोठी
शोककळा पसरली आहे. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात ट्रक चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे....Body:4 April Shirdi Accident Detha Conclusion:4 April Shirdi Accident Detha
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.